रोहित पवार यांचा भाजपवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ विखे गटाला मोठा धक्का!!!

0
185
जामखेड न्युज – – – – 
नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी सायंकाळी भाजपला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. कर्जत जामखेड येथील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे. रोहित पवारांनी भाजपावर परत एकदा सर्जिकल स्ट्राइक केले आहे.
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात तसेच भाजपचे पदाधिकारी सुधीर राळेभात यांच्यासह अनेक कार्यकर्ते तसेच जामखेड तालुक्यातील सोसायट्यांचे चेअरमन, सरपंच, सदस्य, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजप नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे तसेच खासदार सुजय विखे यांचे कट्टर समर्थक म्हणून अमोल राळेभात यांची ओळख होती. माञ राळेभात यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने
सोसायटीमध्ये आमदार रोहित पवारांचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित होणार आहे तसेच आगामी जामखेड नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला फटका बसेल, असा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केला जात आहे.
कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य धनराज कोपनर यांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. ‘अजितदादांनी या सर्वांचं स्वागत करून पक्षात चांगलं काम करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पक्षाच्या सर्व नव्या-जुन्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षाची बांधणी केली जाईल,’ असं रोहित पवार यांनी या प्रवेश सोहळ्यावेळी सांगितले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील
कर्जत जामखेडचे आमदार झाल्यापासून रोहित पवार यांनी भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांना अनेक मोठे धक्के दिले आहेत. भाजपचे विविध स्थानिक नेते राष्ट्रवादीमध्ये घेऊन भाजपला कमकुवत करण्याचं काम आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. याचाच परिणाम म्हणून कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळवली. त्यानंतर आता जामखेड नगरपालिका हे राष्ट्रवादीचे पुढील लक्ष्य असणार आहे आणि त्यादृष्टीनेच रोहित पवार यांनी पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. जामखेडमधील भाजपचे आणखी काही बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लावणार आहे, अशी चर्चा स्थानिक राजकारणामध्ये सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here