जामखेड न्युज – – – –
केज तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गाळपविना मोठ्या प्रमाणावर उभा असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी केजच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी तहसीलदार यांना उसाची मोळी भेट दिली.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील शेतकऱ्याचा ऊस मोठ्या प्रमाणावर उभा असताना साखर कारखाने हे त्यांच्या क्षेत्रा बाहेरील ऊस मोठ्या प्रमाणात गाळपासाठी घेऊन येत आहेत. शेतातील उभ्या ऊसाला १२ महीन्या पेक्षा जास्त कालावधी लोटल्यामुळे त्याचे ३० टक्के वजन घटले आहे. या तफावतीची रक्कम शासनाने शेतकऱ्यांना त्वरीत द्यावी. या मागण्यांसाठी भाजपच्या वतीने आ. नमीताताई मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी उसाच्या मोळीसह तहसीलदार यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात तालुका अध्यक्ष भगवान केदार, अक्षय मुंदडा, विजयकांत मुंडे, उपसभापती ऋषिकेश आडसकर, सुनीलआबा गलांडे, डॉ. वासुदेव नेहरकर, दत्ता धस,, संदीप पाटील, मुरलीधर ढाकणे, राहुल गदळे यांच्यासह भाजपचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.





