जामखेड प्रतिनिधी
ग्रामपंचायतमध्ये मुलीच्या पराभवामुळे आलेल्या नैराश्यातून पत्रकारांविषयी मोहा ता. जामखेड येथिल कार्यक्रमात आर्वाच्च भाषा वापरून पत्रकारांना अपमानित केल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला भास्करराव पेरे पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 31 जानेवारी रोजी ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह मोहा ता. जामखेड येथिल एका कार्यक्रमात भाषणात स्वतः च्या गावातील पाटोदा ता. जि. औरंगाबाद येथील ग्रामपंचायत निवडणूकीत मुलीच्या झालेल्या पराभवाच्या रागातून पत्रकारांना हलकट, हरामखोर अशा शिव्या दिल्या होत्या तसेच दैनिक दिव्य मराठी व पुण्यनगरी तसेच इलेक्ट्रॉनिक मिडिया एबीपी माझाच्या पत्रकारांविषयी आर्वाच्च भाषा वापरून अपमानित केले होते. तेव्हा जामखेड मधील सर्व पत्रकारांनी एकत्र येत याचा निषेध करत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
