जामखेड प्रतिनिधी
न्यायदानात महाराष्ट्र पुन्हा एकदा क्रमांक एकचे राज्य ठरले आहे. छोट्या राज्यांमध्ये हा बहुमान त्रिपुराला मिळाला आहे. टाटा ट्रस्टने राज्यांच्या नागरिकांना न्याय देण्याच्या क्षमतेचे आकलन केले. याचा एक अहवाल इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२० नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये न्यायदानाच्या कामात महाराष्ट्र संपूर्ण देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगण्यात आले आहे.
इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२० मध्ये न्याय प्रक्रियेचे मुख्य चार स्तंभ असलेल्या पोलीस, न्यायालय, कारागृह आणि न्यायालयीन मदत यांच्या आधारे राज्यांना रॅंकिंग दिले जाते. या अहवालानुसार, भारतात सर्वाधिक सहज न्याय प्रणालीमध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या इंडिया जस्टिस रिपोर्टनुसारही महाराष्ट्र नंबर एकचे राज्य होते.
इंडिया जस्टिस रिपोर्ट न्यायव्यवस्थेच्या विविध आयामांवर प्रकाश टाकतो. ओव्हरऑल रँकिंगमध्ये महाराष्ट्र पहिला क्रमांकावर आहे. वेगवेगळ्या मानकांचा विचार केल्यास कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.