कालपासून बेपत्ता असलेल्या चिमुकल्याचा मृतदेह घराजवळील विहिरीत सापडला

0
191
जामखेड प्रतिनिधी
कालपासून  बेपत्ता असलेल्या तालुक्यातील फक्राबाद येथील संग्राम संतोष भोसले, वय वर्ष ६ रा. या मुलाचा
मृतदेह घराजवळच विहिरीत आढळून आला आहे. सदर मुलचा तोल जाऊन पाण्यात पडला असल्याचा अंदाज
वर्तविण्यात येत होता अखेर तोच अंदाज खरा ठरला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 संग्राम संतोष भोसले वय ६ वर्षे हा मुलगा काल दि. ५ फेब्रुवारी रोजी घरासमोर खेळत आसताना अचानक बेपत्ता झाला होता. या बाबत मुलगा हरवला आसल्याचा मॅसेज व फोटो सोशल मिडीयावर देखील फिरत होता. या बाबत पोलीस पाटील योगीनाथ जायभाय यांनी सदरची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड व तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना दिली होती. काल दिवसभर संग्राम
आढळुन आला नसल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी दि. ६ रोजी घराजवळील कठाडे नसलेल्या विहीरीत येथील ग्रामस्थ रज्जाक शेख यांना मुलाच्या चपला विहिरी वरील पाण्यात तरंगताना आढळून आल्या. या नंतर संग्राम विहीरीत पडला आसल्याचे लक्षात आले. यानंतर सदर
विहीरीत दोन मोटारी लावुन पाणी उपसण्यात आले व नंतर दोरीच्या सहाय्याने सदरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. गावाचे चेअरमन यांनी स्वतःचे जनरेटर व ट्रॉक्टर मदतीसाठी दिले होते. या कामी मृतदेह काढण्यासाठी फक्राबाद येथील सरपंच विश्वनाथ राऊत, पोलीस पाटील योगिनाथ जायभाय, तलाठी आर जी भुक्तारे,
कोतवाल महेबूब शेख, पोलिस हेडकॉन्स्टेबल फुलमाळी, ग्रामस्थ काकासाहेब जाधव, नितीन राऊत शरद खताळ अंगद पोकळे यांनी मदत केली.
    दि. ६ रोजी दुपारी दोन वाजता चिमुकल्याचा मृतदेह पाण्याबरोबर काढून शवविच्छेदनासाठी जामखेड येथिल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला वैद्यकीय अधिकारी डॉ शशांक शिंदे यांनी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here