जामखेड प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते रमेश ( दादा ) आजबे यांनी स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड साठी स्वच्छ माझं घर सुंदर माझं अंगण स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामधून जामखेड शहराला भारतात नंबर एक आणण्यासाठी जोरदारपणे काम सुरू आहे.
आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी जामखेड शहराचा स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या पाच शहरात जामखेडचा नंबर आणण्यासाठी स्वच्छता अभियान सुरू केले आहे. यासाठी महिला, सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांचे सहकार्य घेतले जात आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. स्वच्छ व सुंदर तसेच हरित जामखेड साठी नगरपरिषदेस 500 वड व पिंपळाची झाडे दिली आहेत तसेच कचरा संकलनासाठी मोठ्या प्रमाणावर डस्टबीनचे वाटप केले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड साठी स्वच्छ माझं घर स्वच्छ माझं अंगण स्पर्धेचे आयोजन केले आहे त्यासाठी पहिले बक्षीस पाच हजार रुपये, दुसरे बक्षीस तीन हजार रुपये तर तिसरे बक्षीस दोन हजार रुपये ठेवण्यात आले आहे. या साठी नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत.
स्पर्धा दहा दिवसाची असेल, सहभागी महिलेने ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून रोज घंटागाडीत टाकावा, आपले घर अंगण व सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, टाकाऊ मधुन टिकाऊ असा उपक्रम राबवावा, स्वच्छतेविषयी नविन संकल्पना राबवावी, सर्व सहभागी घरांच्या स्वच्छतेचे व्हिडिओ चित्रीकरण होईल, आणी विजेते निवडण्यात येतील सर्व सहभागी घरांना एक डस्टबीन व घड्याळ देण्यात येईल तरी स्वच्छ व सुंदर जामखेड साठी जास्तीत जास्त कुटुंबांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक रमेश ( दादा ) आजबे यांनी केले आहे.