कर्जत, पारनेर मध्ये राष्ट्रवादी तर अकोलेत भाजपचे नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष

0
220
जामखेड न्युज – – – – 
 नुकत्याच झालेल्या अकोले पारनेर आणि कर्जत या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या या पदासाठी निवडणूक बुधवारी पार पडली. यात कर्जत मध्ये बिनविरोध निवडणूक झाली,मात्र पारनेर आणि अकोले या ठिकाणी निवडणूक झाली असली तरी संख्याबळानुसार पारनेर मध्ये राष्ट्रवादी पक्षाचे तर आपल्या अकोल्यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदी निवडून आले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यामधे अकोले, शिर्डी, कर्जत आणि पारनेर या चार ठिकाणी नगर पंचायतीच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या होत्या. मात्र शिर्डी नगर पंचायतीला नगरपालिकेचा दर्जा द्यावा या मागणीसाठी सर्वपक्षीय मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. आणि या मागणीसाठी आग्रही राहत नगरपंचायतीची निवडणूक कोणत्याही पक्षाने लढवली नाही. मात्र जिल्ह्यातील अकोले, कर्जत आणि पारनेर या ठिकाणी निवडणूक झाली. यात कर्जत मध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव करत आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, शिवसेना आघाडीने ही निवडणूक एकत्रित लढवली आणि सतरा पैकी तब्बल पंधरा जागांवर विजय मिळवला. भारतीय जनता पक्षाला केवळ दोन उमेदवार निवडून आणता आले या पार्श्वभूमीवर कर्जत मधून नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोणीही अर्ज दाखल न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उषा अक्षय राऊत या नगराध्यक्षपदी तर काँग्रेस पक्षाच्या रोहिणी सचिन घुले या उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध नियुक्त झाल्याचं आज निवडणूक अधिकारी यांनी घोषित केलं
पारनेर मध्येही अटीतटीची लढत होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारत राष्ट्रवादीचे विजय सदाशिव औटी यांची दहा मते मिळवत नगराध्यक्षपदी यांची निवड झाली त्यांच्या विरोधात असलेले शिवसेनेचे नवनाथ सोबले यांना सहा मते मिळाली आणि ते पराभूत झाले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपनगराध्यक्षपदी सुरेखा अर्जुन भालेकर या निवडून आल्या याठिकाणी शिवसेनेच्या विद्या गंधारी या पराभूत झाल्या आहेत. पारनेर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश लंके हे आमदार आहेत आणि त्यांनी नगर पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आपले वर्चस्व सिद्ध करत तीन वेळेस शिवसेनेकडून आमदार राहिले विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांवर मात करत ही निवडणूक लक्षवेधी बनवली होती. राज्यात महाविकास आघाडी असली तरी पारनेर मध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा मोठा सामना या निमित्ताने पाहायला मिळाला.
अकोले नगरपंचायत मध्ये भारतीय जनता पक्षाच्या सोनाली चेतन नाईकवाडी या नगराध्यक्षपदी तर बाळासाहेब वडजे हे उपनगराध्यक्षपदी निवडून आले. या ठिकाणी निवडणूक झाली असली तरी भारतीय जनता पक्षाने सतरा मधील 12 जागांवर विजय मिळवला असल्याने ही निवडणूक एकतर्फी झाली आणि यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पराभवाचाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे अकोले तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार असताना अकोले नगरपंचायती मध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून आपली अकोले तालुक्यातील पकड दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ही राष्ट्रवादी साठी धोक्याची घंटा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here