जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
सेवा संस्था या गाव व परिसराच्या विकासासाठी महत्त्वाच्या असतात. शेतकर्यांना संस्थेच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ मिळते. सर्व संचालकांनी शेतकर्यांना कर्जपुरवठा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावा. शेतकर्यांना कर्जपुरवठा करताना कोणतेही राजकारण होऊ देणार नाही असे आमदार रोहित पवारांनी सांगितले.
आज दि. १४ रोजी विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते आज दिघोळ, जातेगाव, मोहरी, तेलंगशी, धामणगाव, बांधखडक, काझेवाडी, रत्नापूर, कुसडगाव, अरणगाव, कवडगाव या ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमात आमदार रोहित पवार बोलत होते.
ADVERTISEMENT 

यावेळी रत्नापूर येथे बिनविरोध सोसायटी झाल्याबद्दल सर्व बिनविरोध संचालकांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना आमदार रोहित पवारांनी सांगितले की, तालुक्यातील एकाही शेतकर्यांच्या शेतातील ऊसाचे टिपरूही शिल्लक राहू देणार नाही परिपक्व ऊस नेला जाईल तसेच मतदारसंघात विकासाचा मोठ्या प्रमाणावर अनुशेष होता तो भरून काढण्यासाठी व तालुक्यात मोठय़ा प्रमाणात निधी महाविकास आघाडीचे सरकारच्या माध्यमातून मिळत आहे त्यामुळे रस्ते, वीज व पाणी याबाबत तालुका स्वयंपूर्ण होत आहे. जसे सेवा संस्थेत आपल्या विचाराचे माणसे तुम्ही दिली तसे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्येही आपलीच माणसे हवीत कारण सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसोयी आहेत शेतकर्यांच्या विकासासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती अत्यंत महत्वाची आहे.
कोणी संचालकांना किंवा मतदारांना दमबाजी करत असेल तर सांगा त्यांचाही बंदोबस्त करू आता दमबाजी करण्याचे दिवस संपले आहेत. विकासाचे राजकारण करावे व जनतेची सेवा करावी जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही.
सेवा संस्थेबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीही आपल्या विचाराची हवी कारण जोपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास होत नाही तोपर्यंत शेतकर्यांचा विकास करता येत नाही. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक गैरसोयी आहेत. शेतकऱ्यांना बसण्यासाठी जागा नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही सर्व सुविधांनी युक्त बाजार समिती करण्यासाठी आपल्या विचाराचे माणसे हवीत असेही पवार यांनी सांगितले.