Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या आयपीएल 2022 लिलाव : फ्रेंचायजींनी कोणत्या खेळाडू वर किती खर्च केला,...

आयपीएल 2022 लिलाव : फ्रेंचायजींनी कोणत्या खेळाडू वर किती खर्च केला, कोणता खेळाडू सर्वात महाग जाणून घ्या

0
239
जामखेड न्युज – – – – 
जगातील सर्वात श्रीमंत टी-20 क्रिकेट लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल 2022 स्पर्धेचा महालिलाव सुरू झाला आहे. काल म्हणजेच शनिवारी 12 फेब्रुवारी रोजी लिलावाचा पहिला दिवस पार पडला. आणि पहिल्याच दिवशी अनेक भारतीय खेळाडू करोडपती झाले. ईशान किशन, दीपक चहर, आवेश खान, राहुल तेवतिया, राहुल त्रिपाठी, राहुल चहर, शार्दुल ठाकूर यांना संघात समाविष्ट करण्यासाठी फ्रेंचायजींनी अक्षरश: पाण्यासारखा पैसा खर्च केला.
लिलावाच्या पहिल्या दिवशी तब्बल 97 खेळाडूंवर बोली लागली. यामधील 74 खेळाडूंना संघात स्थान मिळाले, तर 23 खेळाडूंना एकही खरेदीदार मिळाला नाही. युवा भारतीय विस्फोटक फलंदाज ईशान किशनला (15.25 कोटी) सर्वाधिक रक्कम मिळाली, तर आवेश खान आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला. लखनऊने त्याच्यासाठी 10 कोटी मोजले.
लिलावाच्या पहिल्या दिवशी महागडे ठरलेले खेळाडू
ईशान किशन – 15.25 कोटी (मुंबई इंडियन्स)
दीपक चहर – 14 कोटी (चेन्नई सुपर किंग्ज)
श्रेयस अय्यर – 12.25 कोटी (कोलकाता नाइट रायडर्स)
शार्दुल ठाकूर – 10.75 कोटी (दिल्ली कॅपिटल्स)
वनिंदू हसरंगा – 10.75 कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
निकोलस पूरन – 10.75 कोटी (सनरायझर्स हैदराबाद)
हर्षल पटेल – 10.75 कोटी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
आवेश खान – 10 कोटी (लखनऊ सुपर जायंट्स)
दरम्यान पहिल्या दिवसानंतर कोणत्या टीमकडे किती खेळाडू झाले आहेत आणि प्रत्येक टीमकडे किती पैसे शिल्लक आहेत. यावर एक नजर टाकूया…
चेन्नई सुपर किंग्स – ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, मोईन अली, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, दीपक चहर, ड्वॅन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, केएम आसिफ, तुषार देशपांडे. (विकत घेतलेले खेळाडू – 10, शिल्लक रक्कम – 20. 45 कोटी रुपये)
दिल्ली कॅपिटल्स – डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, ऋषभ पंत, सरफराज खान, केएस भरत, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, एनरिच नॉर्किया, कमलेश नागरकोटी, मुस्तफिजूर रहमान, अश्विन हेब्बार (विकत घेतलेले खेळाडू – 13, शिल्लक रक्कम – 16.50 कोटी)
गुजरात टायटन्स – शुभमन गिल, जेसन रॉय, अभिनव मनोहर, हार्दिक पांड्या, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, आर.साई किशोर, नूर अहमद. (विकत घेतलेले खेळाडू – 10, शिल्लक रक्कम – 18.85 कोटी)
कोलकाता नाईट रायडर्स – व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर, शेल्डन जॅक्सन, आंद्रे रसेल, सुनिल नारायण, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती. (विकत घेतलेले खेळाडू – 9, शिल्लक रक्कम – 12.65 कोटी)
लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल, क्विंटन डिकॉक, मनिष पांडे, दीपक हुड्डा, मार्कस स्टॉयनिस, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, रवी बिष्णोई, आवेश खान, मार्क वूड, अंकीत राजपूत. (विकत घेतलेले खेळाडू – 11, शिल्लक रक्कम – 6.90 कोटी)
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड बेरविस, कायरन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, एम.अश्विन, बसिल थंपी. (विकत घेतलेले खेळाडू – 8, शिल्लक रक्कम – 27.85 कोटी रुपये)
पंजाब किंग्स – शिखर धवन, मयंक अग्रवाल, जॉनी बेयरस्टो, जितेश शर्मा, प्रभसिमरन सिंग, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, इशान पोरेल. (विकत घेतलेले खेळाडू – 11, शिल्लक रक्कम – 28.65 कोटी रुपये)
राजस्थान रॉयल्स – देवदत्त पडिक्कल, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, जॉस बटलर, शिमरन हेटमायर, रियान पराग, आर.अश्विन, ट्रेन्ट बोल्ट, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, केसी करियप्पा. (विकत घेतलेले खेळाडू – 11, शिल्लक रक्कम – 12.15 कोटी)
आरसीबी – फाफ डुप्लेसिस, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, जॉश हेजलवूड, मोहम्मद सिराज, आकाश दीप. (विकत घेतलेले खेळाडू – 11, शिल्लक रक्कम – 9.25 कोटी रुपये)
हैदराबाद – अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, केन विलियमसन, निकोलस पूरन, प्रियम गर्ग, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जे सुचित, श्रेयस गोपाळ, कार्तिक त्यागी, टी नटराजन, उमरान मलिक. (विकत घेतलेले खेळाडू – 13, शिल्लक रक्कम – 20.15 कोटी रुपये)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!