रोहित पवारांनी निवडणुकीत जनतेला दिलेला शब्द पाळला; खर्डा आणि मिरजगावसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर

0
196
जामखेड न्युज – – – – 
 कर्जत जामखेड तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नातून आता मतदारसंघात २ स्वतंत्र पोलिस ठाणे मंजूर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने जामखेड तालुक्यातील खर्डा येथे तर कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे नव्याने स्वतंत्र पोलीस ठाण्यासाठी नुकतीच परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे पोलीस विभागाला अधिकचे मनुष्यबळ मिळेल तसेच परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मदत होईल. खर्डा आणि मिरजगाव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे यासाठी आमदार रोहित पवार सतत पाठपुरावा करत होते. तसेच निवडणुकीच्या काळात त्यांनी या संदर्भात जनतेला शब्द देखील दिला होता.
अखेर रोहित पवार यांनी दिलेला शब्द पाळला असून खर्डा आणि मिरजगावला त्यांनी नव्याने पोलीस ठाणे मंजूर करून आणले आहे. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर आता दोन्ही तालुक्यातील गावेदेखील नव्या पोलीस ठाण्यांतर्गत विभागली जाणार आहे.
नव्याने पोलीस ठाणे मंजूर करून आणण्याबरोबरच आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून मतदारसंघात पोलिस वसाहतीचेही काम प्रगतिपथावर आहे. मतदारसंघातील विविध विकासकामांच्या संदर्भात आमदार रोहित पवार प्रयत्नशील असून वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा करून ते विविध मंजुऱ्या जनतेच्या सेवेसाठी मिळवून आणत असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे.
प्रतिक्रिया –
खर्डा व मिरजगावमध्ये दोन स्वतंत्र पोलिस ठाणे मंजूर करून आणल्यामुळे कर्जत व जामखेड तालुक्याला पोलिसांची अजून चांगली सेवा देण्यासाठी मदत होईल. त्याबरोबरच पोलिसांवर येणारा ताणही कमी होईल व त्यांना अधिकचे मनुष्यबळ मिळेल  – आमदार रोहित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here