साकत गणात सर्वाधिक लोकसंपर्क असणारा व जनसामान्यांच्या अडीअडचणीसाठी धावून जाणारा लोकनेता – डॉ. भगवानराव मुरुमकर

0
308
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – – – – 
जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य डाॅ. भगवान मुरुमकर यांचा बालेकिल्ला असलेल्या साकत गणाचा जिल्हा परिषद गटात सामावेश होत असेल तर डॉ. भगवान मुरुमकर यांना जिल्हा परिषद सदस्य होणाची नामी संधी येणार असल्याची चर्चा राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. कारण “हॅलो म्हटले की आलो ” व साध्या मिसकाॅललाही परत फोन करून विचारपूस करणारा तसेच विकासाची गंगा गरजूंच्या वाडी वस्ती पर्यंत घेऊन जाणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
       २०१२ ते १७ पर्यत पंचायत समितीचे सभापती आसताना मोठ्या प्रमाणात विकास कामाबरोबर तालुक्यातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना आधुनिक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या त्यामुळे तालुक्यातील तालुक्यातील ९४ जिल्हा परिषद शाळा तसेच दहा अंगणवाड्या आयएसओ झालेल्या होत्या तसेच पंचायत समितीचा कारभार अद्यावत केल्याने पंचायत समितीलाही आयएसओ मानांकन प्राप्त झाले होते. तर २०१७ ते २२ पंचायत समिती सदस्य आसताना गणात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केलेली आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजना तळागाळातील व्यक्तीच्या वाडी वस्ती पर्यंत नेल्या त्यामुळे परिसरातील जनतेला एक आपल्या हक्काचा एक आपल्यातील नेता डॉ भगवानराव मुरुमकर यांच्या रूपाने मिळाला आहे अशी भावना आहे.
कोरोनाच्या काळात लोकांना भेटून धीर देण्याचे काम केले तसेच जे लोक हाॅस्पिटलमध्ये आहेत त्यांना भेटून रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिले, ज्यांना आॅक्सिजन बेड मिळत नाहीत त्यांना ते मिळवून दिले लोकांना मोठा धीर देण्याचे काम केले.
तसेच गरजूंना वैयक्तिक लाभामध्ये विहिरी, शेततळे, फळबाग, गोठा शेड, शेळी शेड मुख्यमंत्री सहायता निधी मधून हॉस्पिटल चे बिल असे अनेक कितीतरी कामे केली त्यामुळे आपल्या हक्काचा नेता म्हणून डॉ. भगवानराव मुरुमकर यांच्या कडे पाहिले जाते. साकत गणासाठी सर्वात लोकप्रिय नेता कामाचा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.
जिल्हा परिषद अहमदनगरच्या गट व गणाच्या कच्चा आराखडय़ात जामखेड तालुक्यातील साकत जिल्हा परिषद गट अस्तित्वात येत असल्याचे दिसत आहे. जवळपास गेली १० वर्षांपासून साकत पंचायत समिती गणात विविध विकास कामे करताना मतदारांशी जवळून संपर्क व सबंध असलेले डॉ. भगवान मुरुमकर नव्याने होत असलेल्या साकत जिल्हा परिषद गटात प्रमुख दावेदार असल्याचे दिसत आहे.
 पंचायत समीतीचे सभापती असताना त्यांनी अनेक लाभार्थींना वैयक्तीक लाभाच्या योजना दिल्या असल्याने त्यांचा वैयक्तिक जनसंपर्क मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. सद्या तरी निर्माण होत असलेल्या साकत गटात डॉ. भगवान मुरुमकर यांच्यासारखा मोठा जनसंपर्क असलेला दावेदार उमेदवार नाही अशी चर्चा साकत गणात होत असल्याचे दिसत आहे.
नव्याने होणार्‍या साकत जिल्हा परिषद गटाचा सदस्य होण्याचा मान  सभापती भगवान दादा मुरुमकर यांना मिळण्याचा जास्त अंदाज आहे कारण गेल्या दहा वर्षांत ते साकत पंचायत समिती सदस्य आहेत पाच वर्षे ते सभापती होते सभापती च्या कार्यकाळा मध्ये प्रत्येक गावात वाडी वस्तीवर जाऊन लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले म्हणून जनतेने पुन्हा त्यांना संधी दिली होते आता होणार्‍या नवीन गटामध्ये साकत गणातील गावे आहेत त्याचा फायदा त्यांना होणार आहेत नवीन येणाऱ्या पण गावामध्ये त्याचा संपर्क असल्यामुळे त्यांना फायदा होणार आहे गरीब कुटुंबातून राजकारणात येऊन जनतेसाठी फुल टाईम देणार नेता म्हणून त्यांची ओळख आहे लोकांच्या सुख दुःखात सामिल होणार आपला माणुस आपल्या हक्काचा माणुस म्हणुन जनता भगवान दादा कडे बघते म्हणून जनतेला त्यांचा हक्काचा माणुस निवडायची संधी असते आणि जनता भगवान दादा कडे त्यांचा हक्काचा माणुस म्हणुन बघते प्रत्येक गावात वाडी वस्तीवर भगवान दादा यांच्या नावाची चर्चा जोरदार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here