कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढविण्‍यासाठी सुक्ष्‍म नियोजन करावे – जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

0
179
जामखेड न्युज – – – – 
 कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी आणि जिल्‍ह्यातील रुग्‍ण संख्‍या कमी होण्‍यासाठी कोरोना लसीकरण आणि कोरोना चाचण्‍या अधिक प्रमाणात होण्‍यासाठी आरोग्‍य यंत्रणेने आणि प्रशासनाने सुक्ष्‍म नियोजन करावे, अशा सूचना जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्‍या.
            जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाच्‍या वतीने कोविड 19  प्रतिबंधात्मक उपाय योजना बाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत डॉ. भोसले बोलत होते.
      यावेळी बैठकीत निवासी उपजिल्‍हाधिकारी संदीप निचित, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. संजय घोगरे, महानगरपालिका, पोलीस विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
            श्री भोसले म्हणाले, प्रत्‍येक तालुक्‍यात लसीकरण वाढविणे आवश्‍यक असून यासोबतच कोविड चाचण्‍याही वाढविण्‍याच्‍या दृष्‍टीने संबंधित यंत्रणांनी प्रयत्‍न करावे. दैनंदिन कोविड रुग्‍णसंख्‍या कमी-जास्‍त  प्रमाणात वाढत असून कोविड केअर सेंटर सुरू ठेवण्‍याबाबत सुध्‍दा नियोजन करावे, असे त्‍यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here