Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या पुन्हा एकदा पुतण्याचा विजयी गुलाल, काकाची धुळधाण

पुन्हा एकदा पुतण्याचा विजयी गुलाल, काकाची धुळधाण

0
300
जामखेड न्युज – – – 
बीड तालुक्यातील राजूरी येथील सेवा सोसायटीच्या (Rajuri Seva Society) 13 जागेंसाठी निवडणूक पार पडली. सोसायटीच्या 13 ही जागेवर राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा दणदणीत विजय झाला. तर शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर (Jaidatta Kshirsagar) यांना मात्र या निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागला. यावेळी विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गावातच गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. राजुरी हे गाव दोन्ही क्षीरसागर यांचे आहे. त्यामुळे इथे काका-पुतण्याची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पुन्हा एकदा पुतणे संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना पराभवाची धूळ चारली आहे. नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर पुतणे संदीप क्षीरसागर यांची सुरू असलेली घोडदौड ही काका जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जातेय.
काका-पुतण्या वादाची परंपराच!
बीड जिल्ह्यातील राजकारणात काका आणि पुतण्याचा वाद काही नवीन नाही. मात्र गोपीनाथ मुंडेंनंतर बीडमधील क्षीरसागर काका पुतण्याचा राजकीय कट्टरवाद राज्यासमोर आलाय. शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनी गावची सेवा सोसायटी ताब्यात यावी म्हणून भरपूर प्रयत्न केले होते. मात्र त्यांना पूर्णतः अपयश मिळाले.
आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील तळ ठोकून
काका पुतण्यात खरी राजकीय लढाई सुरू असतानाच राजुरी येथील सेवा सोसायटीच्या निवडणुकीत आमदार संदीप यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी गावातच तळ ठोकून राहिले होते. त्यामुळे पहिल्यांदाच भाऊ विरुद्ध भाऊ अशी लढत पहावयास मिळाली. रवींद्र क्षीरसागर हे जयदत्त क्षीरसागर यांचे लहान बंधू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!