जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – (सुदाम वराट)
परिसरातील शेतकर्यांच्या मुलांनी एकत्र येऊन पाटोदा येथे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा पेरणीसाठी दर्जेदार खते, बियाणे व औषधे एकाच छताखाली योग्य भावात मिळावित म्हणून दहा सुशिक्षित मुलांनी एकत्र येऊन भामेश्वर अॅग्रो प्रोड्युसर कंपनी स्थापन केली कंपनीस माजी पंचायत समितीचे सभापती संजय वराट, कृषी अधिकारी सुरेश वराट यांनी भेट देत माहिती जाणून घेतली.
यावेळी कृषी तज्ञ अविन लहाने, प्रा. महादेव वराट, विशाल आरसुळ, शंकर चौगुले, कैलास घरत, गणेश आरसुळ, जनार्धन कोठुळे, बाबुराव सोंडगे, महावीर घुमरे, पत्रकार सुदाम वराट, राजाभाऊ वराट, प्रा. माणिक वराट, ग्रामपंचायत सदस्य, विठ्ठल वराट, सेवा संस्थेचे सदस्य युवराज वराट, बिभिषण वराट, पोपट मुरुमकर यांच्या सह अनेकजण हजर होते.
शेतकर्यांचा स्वाभिमान कायम टिकवून शेती फायद्याची करण्यासाठी सुशिक्षित शेतकरी पुत्रांनी एकत्र येऊन कंपनीची स्थापना केली. त्यांचा उद्देश शेतकरी हिताचा आहे. शेतकर्यांसाठी ग्रीडिंग मशिन आणण्याचा तसेच कंपनीचा स्वतः चा ब्रॅड असलेले सोयाबीन, कांदा, उडीद, तुरीचे वाण बाजारात आणणार असल्याची माहिती कृषी तज्ञ अविन लहाने यांनी दिली.
भामेश्वर अॅग्रो प्रोड्युसर कंपनीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना योग्य किंमतीत दर्जेदार कंपनीची उच्च प्रतीचे औषधे, खते, बियाणे उपलब्ध होत आहेत अशी शेतकरी वर्गात चर्चा आहे त्यामुळे अल्पावधीतच कंपनीने चांगला नावलौकिक मिळविला आहे.





