जामखेड प्रतिनिधी
श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्त्री शक्तीचा आदर व जागर व भव्य आरती सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जामखेड शहरात आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी महिला समाजसुधारकांच्या कार्याचे पारायण सप्ताहात होणार आहे.सातही दिवस महिला किर्तनकारांची किर्तने आयोजित करण्यात आली आहेत. तरी या सप्ताहाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन भक्ती शक्ती महोत्सवाच्या आयोजकांनी केले आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुराष्ट्राचा दैवत यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील समाज प्रबोधन करणाऱ्या महिला भगिनींचे समाज प्रबोधन पर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक 13 फेब्रुवारी 2021 23 फेब्रुवारी 2021 हा उत्सव होईल श्री ह भ प शालिनीताई देशमुख इंदुरीकर यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न होईल यावर्षी सप्ताहचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड हिंदुस्थान मध्ये स्त्री आदर व सन्मान केला आज समाजामध्ये खूप अराजकता माजली आहे. माझंच आहे हा मनीमानसी विचार करून ज्या माझ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड हिंदुस्थान मधील स्त्री ही माझी आई बहीण आहे असा संदेश दिला त्यात श्री छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आज स्त्री मातृत्वाला सन्मान देण्याची संस्कृती निर्माण होणे ही काळाची गरज ओळखून श्री महाराजांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने अखंड महाराष्ट्रातील महिला कीर्तनकारांना बोलून राष्ट्रमाता जिजाऊ शिक्षणाची गंगोत्री घराघरापर्यंत पोहोचवणाऱ्या सावित्रीबाई फुले कर्मवीर लक्ष्मीबाई भाऊराव पाटील अखंड हिंदुस्थानातील हिंदूंच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर श्री संत जनाबाई श्री संत मुक्ताबाई श्री संत मीराबाई श्री संत बहिणाबाई यांचा इतिहास व त्यांचे कार्य समाजासमोर यावं व खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचा काम उभा रहावं व स्त्रीशक्तीला मातृत्व सर्वांच्या नजरेत भरावं यासाठी या उत्सवाचे आयोजन आहे यावर्षी पूर्ण उत्सव माता भगिनींच्या मार्गदर्शनाने आयोजन होइल तरी आपण सर्वांनी रोज सायंकाळी नऊ ते अकरा या कीर्तनात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच आपल्याला आयोजकांतर्फे प्रार्थना विनंती आहे.

दि. 13 रोजी ह भ प शिवलिला ताई पाटील बार्शी, दि. 14 रोजी रुक्मिणी ताई हावरे जालना, दि. 15 रोजी शिवचरित्र व्याख्याते गौरीताई सांगळे पंढरपुर, दि. 16 रोजी राधाताई महाराज सानप महासांगवी, दि. 17 रोजी समाजप्रबोधनकार शितलताई साबळे राहुरी, दि. 18 रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध भारूडकार गंगुबाई जाधव व त्यांचे भजनी मंडळ बार्शी, दि. 19 रोजी प्रांजल ताई पाणसरे श्रीरामपूर तर दि. 20 रोजी सायंकाळी 6 ते 8 काल्याचे किर्तन ह-भ-प समाजप्रबोधनकार शालिनीताई महाराज देशमुख इंदुरीकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन पुरणपोळीच्या महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप होईल या कार्यक्रमाचे मंडप साऊंड सिस्टिम डेकोरेशन ग्राउंड बैठक व्यवस्था आमदार रोहित पवार, रमेश (दादा) आजबे यांची राहिल, सर्व कीर्तनकार संत यजमान संत वामन भाऊ ट्रेडर्स- रगुनाथ मिसाळ, पूर्ण प्रसिद्धी विभाग ज्ञानेश्वर तुकाराम झेंडे संचालक पणन मंडळ महाराष्ट्र राज्य व आरतीचे यजमान आणखी होत आहेत सोमनाथ मच्छिंद्र राळेभात, महेश चंद्रकांत राळेभात कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे व शासनाने जे नियम घालून दिले आहेत सोशल डिस्टंसिंग मास्क वापरावे ज्याच्याकडे मास्क नसेल त्याला कार्यक्रमांमध्ये येऊ दिला जाणार नाही सोशल डिस्टंसिंग पूर्ण ग्राउंड वरती बैठक व्यवस्था करण्यात आली आहे आपण सर्वांनी शिस्त पाळावी व श्री महाराजांची जयंती हा माझा सण आहे तो सण मी उत्सहात आनंदात व निर्विघ्नपणे पार पाडेल अशी शपथ घेऊनच मी या कार्यक्रमाला जाईल प्रत्येकानं कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करावे आपले नम्र भक्ती-शक्ती महोत्सव समिती जामखेड अध्यक्ष सोमनाथ पोकळे उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, कार्याध्यक्षअमित चिंतामणी, स्वागताध्यक्ष रमेश (दादा) आजबे, कोषाध्यक्ष सुरेश पवार, सचिव दीपक महाराज गायकवाड, सन्माननीय मार्गदर्शक दत्तात्रेय सोले पाटील, नितीन राळेभात, काकासाहेब नेटके, अण्णा मांजरे, ज्ञानेश्वर झेंडे, महेश राळेभात, ओंकार झेंडे उत्कर्ष कुलकर्णी, मयूर नेटके, प्रज्वल राळेभात, आशीर्वाद डोंगरे, शिवम पोकळे, राहुल गंभीरे, संतोष राळेभात, सचिन मासाळ, अॅड. प्रवीण सानप, संदीप सांगळे, वैभव भैय्या राऊत, माधव पवार, गणेश वेदपाठक व भक्ती-शक्ती महोत्सव समितीचे हितचिंतक कार्यकर्ते. यांनी आवाहन केले आहे.