जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – –
महाराष्ट्र सरकारने वाईन बाबत जो निर्णय घेतला आहे तो शेतकर्यांच्या फायद्यासाठी घेतलेला आहे. शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी द्राक्ष व इतर पिकांची जोड द्यावी द्राक्ष मध्ये जास्त प्रमाणात वाईन असते. म्हणूनच सरकारने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला असावा असे वाटते असे आमदार रोहित पवारांनी सांगितले.
आज जामखेड तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार रोहित पवारांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, कर्जत जामखेड गटप्रमुख प्रा.मधुकर राळेभात, शरद शिंदे, राजेंद्र पवार, सचिन घुमरे, चंद्रकांत गोलेकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वाईन सुपरमार्केटमध्ये विक्री वर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. याविषयी आज आमदार रोहित पवारांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारने हे धोरण घेतले आहे. आणखीही चांगले धोरण आखण्याची गरज आहे असेही सांगितले