केंद्रीय अर्थसंकल्पात युवकांचे प्रश्न दुर्लक्षित – आमदार रोहित पवार

0
288

जामखेड प्रतिनिधी

              जामखेड न्युज – – – – –
    केंद्रीय अर्थसंकल्पात शहरी व ग्रामीण रोजगाराबाबत युवकांचे प्रश्न दुर्लक्षित आहेत. मागील अर्थसंकल्पात रोजगारावर ९८ हजार कोटी रुपये बजेट होते चालू वर्षी ते ७८ हजार कोटी केले आहे. तसेच देशात नऊ कोटीपेक्षाही जास्त बेरोजगार युवा वर्ग आहे यांच्यासाठी अर्थसंकल्पात तरतुद अत्यंत तुटपुंजी आहे असे आमदार रोहित पवारांनी सांगितले.
      आज जामखेड तालुक्यातील राजुरी, नायगाव, शिऊर, देवदैठण, सावरगाव, मोहा या ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, कर्जत जामखेड गटप्रमुख प्रा.मधुकर राळेभात, शरद शिंदे, राजेंद्र पवार, सचिन घुमरे, चंद्रकांत गोलेकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
     यावेळी पत्रकारांशी केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी विचारले असता ते म्हणाले की, या अर्थसंकल्पात काही चांगल्या गोष्टी असतील पण आरोग्य, युवा वर्ग यांची निराशा झालेली आहे तसेच आपला जीडीपी दोन वर्षांत फक्त दीड ते दोन टक्क्यांनीच वाढलेला आहे. नऊ कोटी पेक्षा जास्त युवा बेरोजगार आहेत यांच्यासाठी व आरोग्यविषयक जादा तरतुदी आसावयास हव्या होत्या असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here