जामखेड प्रतिनिधी
अनेक वर्षे एकहाती सत्ता असलेल्या आदर्श गाव पाटोदा ता. जि. औरंगाबाद ग्रामपंचायत मध्ये भास्करराव पेरे पाटील यांच्या मुलीचा पराभव झाला यामध्ये त्यांचे मनोधैर्य खच्ची झालेले आहे यामुळे त्यांनी जामखेड येेेथील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह आयोजित कार्यक्रमात पत्रकारांवर गलिच्छ भाषेत टीका केली असुन अर्वाच्च भाषेत पत्रकाराना अपमानित केले त्यामुळे जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकाराने भास्कर पेरे यांचा जाहिर निषेध करून तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना निषेधाचे निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

यावेळी निवेदन देताना नासीर पठाण, अशोक निमोणकर, मिठूलाल नवलाखा, अविनाश बोधले, नंदू परदेशी, मोहीद्दीन तांबोळी, समीर शेख, अशोक वीर, ओंकार दळवी, प्रकाश खंडागळे, फारूक शेख, अजय अवसरे, पप्पू सय्यद, किरण रेडे, धनराज पवार, रोहित राजगूरू यांच्या सह अनेक पत्रकार उपस्थित होते.