जामखेड प्रतिनिधी
महिला सक्षमीकरणासाठी महिला मेळावे, तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन दुर्दर आजाराने त्रस्त लोकांसाठी मोफत निसर्गोपचार महाआरोग्य शिबीराचे आयोजन, रस्ते, वीज व पाण्याची टंचाई असलेल्या भागात पदरमोड करून समस्या सोडवून नागरिकांची सोय केली. आणी आता लहान मुलांना खेळण्यासाठी क्रिकेट व बॅडमिंटनचे साहित्य वाटप केल्याने सामाजिक कार्यकर्ते व सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते रमेश (दादा) आजबे यांचे मुलांनी आभार मानले आहेत. तर सर्वसामान्य नागरिक आजबे यांना धन्यवाद देत आहेत.

सामाजिक कार्यकर्ते रमेश ( दादा ) आजबे हे कोट्यावधी रुपयांची पदरमोड करून सामाजिक कामे करत आहेत. अनेक ठिकाणचे रस्ते, मुरमीकरण, मंदिरांचा जिर्णोद्धार, अनेक ठिकाणी पेव्हिंग ब्लाॅक, ग्रामीण रुग्णालय कुपनलिका घेऊन विद्युत मोटार बसवल्याने रूग्णालयातील रूग्ण व नातेवाईकांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. कोविड रूग्णांवर मोफत उपचार करणाऱ्या आरोळे कोविड सेंटरला गहू व तांदळाचा तसेच लाखो रुपयांचा आॅक्सिजन पुरवठा केला, आजाराने त्रस्त लोकांसाठी निसर्गोपचार तज्ञ डॉ. स्वागत तोडकर यांचे मोफत निसर्गोपचार महाआरोग्य शिबीराचे आयोजन केले यात सुमारे 2700 रूग्णांना फायदा झाला, महिला मेळाव्याचे आयोजन करून स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन ठेवून महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला तसेच स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड साठी शहरात मोठय़ा प्रमाणावर डस्टबीनचे वाटप केले तसेच हरित जामखेड करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर वड व पिंपळाची झाडे नगरपरिषदेला दिली व शहरातील ल. ना. होशिंग विद्यालयाच्या समोरील बाजूस वृक्षारोपण तसेच पंचायत समितीच्या आवाराबाहेर वृक्षारोपण करून संरक्षक जाळी बसवून उन्हाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा केला यामुळे कोट्यावधी रुपयांची पदरमोड करून सावळेश्वर उद्योग समूहातर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक कार्यकर्ते रमेश ( दादा ) आजबे हे समाजकार्य करत आहेत.

पोकळे वस्तीवरील मुलांसाठी क्रिकेटचे किट तसेच मुलींसाठी बॅडमिंटनचे साहित्य दिल्याने बच्चे कंपनीच्या चेहर्यावर एक वेगळाच आनंद दिसुन आला सर्व मुलांनी रमेश (दादा) आजबे यांचे आभार मानले आहेत.