जामखेड न्युज – – – – –
जिल्हा नियोजन समितीवर शिवसेनेचे जामखेड तालुकाप्रमुख संजय काशीद यांच्या नियुक्तीने जामखेड तालुक्याच्या प्रश्रांना वाचा फुटणार असून, यामधून विविध विकास कामांना चालना मिळण्यास मदत होणार असल्याचा विश्वास सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा नियोजन समितीवर शिवसेनेचे जामखेड तालुकाप्रमुख संजय काशीद यांची निवड झाल्याबद्दल येथील कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. कोठारी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत काशीद यांचा सत्कार केला. यावेळी प्रफुल्ल सोळंकी,मनोज कुलथे, सागर गुंदेचा, संजय नहार , प्रशांत राखेचा,विजय अष्टेकर, चंदन अंधारे ,महेश निंबाळकर ,किरण काळे, समीर शेख उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते कोठारी म्हणाले,काशीद यांनी शिवसेनेच्या माध्यमातून आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची निवड झाली असल्याने ते या पदाला नक्कीच न्याय देतील.अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
याबाबत राज्य शासनाच्या नियोजन विभागाने ३१जानेवारी २०२२ रोजी आदेश जारी केला असून, त्यामध्ये संसद व विधिमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित दोन सदस्य, त्याचबरोबर जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले चार नामनिर्देशित सदस्य, आणि विशेष निमंत्रित १४ सदस्य अशा एकूण वीस सदस्यांची नियुक्ती जिल्हा नियोजन समितीमध्ये करण्यात आली आहे.
जिल्हा नियोजन समितीचे पदसिध्द अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हसन मुश्रीफ हे असणार आहेत तसेच जिल्हाधिकारी पदसिध्द सदस्य सचिव जिल्हा नियोजन समितीवर म्हणून काम पाहणार आहेत. निमंत्रित सदस्य म्हणून जामखेड तालुक्याचे प्रतिनिधी संजय काशिद असणार आहेत.