Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या तालुक्याच्या विकासासाठी मिळालेल्या पदाचा उपयोग करणार – संजय काशिद. ...

तालुक्याच्या विकासासाठी मिळालेल्या पदाचा उपयोग करणार – संजय काशिद. प्रा. लक्ष्मण ढेपे मित्रमंडळाच्या वतीने सत्कार

0
270
जामखेड प्रतिनिधी 
                जामखेड न्युज – – – – 
   मिळालेल्या पदाचा जामखेड तालुक्याच्या विकासासाठी निश्चितपणे उपयोग करून संधीचे सोने करू असे मत संजय काशिद यांनी सत्काराला उत्तर देताना केले
          जिल्हा नियोजन समितीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून जामखेड मधुन शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांची निवड झाली याबद्दल त्यांचा प्रा. लक्ष्मण ढेपे मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी संजय काशिद, प्रा. लक्ष्मण ढेपे, पत्रकार सुदाम वराट, किरण रेडे, धनराज पवार, युवा नेते बापूसाहेब मडके, अजय गौड, भारत पवार, परसराम लांडगुले, सागर कोल्हे, दीपक सुरसे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
   यावेळी बोलताना संजय काशिद म्हणाले की, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी माझी शिफारस करून जो माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरविणार व तालुक्याच्या विकासासाठी पदाचा उपयोग करणार. असे सांगीतले
     यावेळी बोलताना प्रा. लक्ष्मण ढेपे म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित सदस्यांत निवड होणे हा मोठा बहुमान आहे. तालुक्याच्या विकासासाठी निश्चितच उपयोग करावा असे आवाहन केले.
 राज्य शासनाच्या नियोजन विभागाने आज सोमवारी आदेश जारी केला असून त्यामध्ये संसद व विधिमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित दोन सदस्य, त्याचबरोबर जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले चार नामनिर्देशित सदस्य, आणि विशेष निमंत्रित 14 सदस्य अशा एकूण वीस सदस्यांची नियुक्ती जिल्हा नियोजन समितीमध्ये असणारा आहेत.
  विशेष 14 निमंत्रित सदस्यांमध्ये जामखेड मधुन संजय काशिद यांची वर्णी लागली आहे त्यामुळे जामखेड तालुक्यात संजय काशिद मित्रमंडळाच्या वतीने फटाके फोडून स्वागत केले आहे. व अनेक मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जिल्हा समितीचे अध्यक्ष अर्थातच जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हसन मुश्रीफ हे असणार आहेत तसेच जिल्हाधिकारी सदस्य सचिव जिल्हा नियोजन समितीवर म्हणून काम पाहतील.
शासनाने नियुक्त केलेले सदस्य याप्रमाणे..
संसद व विधिमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित सदस्य-
१)सदाशिव किसन लोखंडे, लोकसभा सदस्य शिर्डी मतदारसंघ.
२) लहू नाथा कानडे, विधानसभा सदस्य, श्रीरामपूर मतदार संघ
जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले नामनिर्देशित सदस्य-
१) प्रभाकर रघुनाथ गाडे (राहणार बारागाव नांदुर तालुका राहुरी)
२) अविनाश गोविंदराव आदिक (राहणार श्रीरामपूर)
३) बाबासाहेब दिघे (राहणार श्रीरामपूर)
४) हर्षवर्धन अशोक बोठे (राहणार वाळकी तालुका जिल्हा अहमदनगर)
विशेष निमंत्रित सदस्य –
१)डॉ. नरेंद्र घुले पाटील (रा-शेवगाव)
२)ऋषिकेश प्रताप ढाकणे(र-पाथर्डी)
३)बाबासाहेब भिमाजी तरटे (राहणार भाळवणी तालुका पारनेर)
४) पोपटराव गणुजी दराडे (राहणार समशेरपूर तालुका अकोले)
५) सोनाली राहुल रोहमारे (राहणार बोरावके वस्ती धारणगाव रोड कोपरगाव)
६) प्रवीण विठ्ठल घुले (राहणार कर्जत)
७) बी आर चकोर (राहणार संगमनेर)
८) मधुकर नवले (राहणार अकोले)
९) जयंत रामनाथ वाघ (अहमदनगर)
१०)विशाल राजेंद्र झावरे (राहणार काळे मळा कोपरगाव)
११)संजय नारायण काशीद (राहणार मुंजोबा गल्ली मेन रोड जामखेड)
१२) शरद मधुकर झोडगे (राहणार नागरदेवळे तालुका नगर)
१३) भागवत बाळासाहेब मुंगसे (राहणार देवळाली प्रवरा तालुका राहुरी)
१४) अभिजीत भगवान खोसे (राहणार-संयम अपार्टमेंट, बुरुडगाव रोड अहमदनगर.
    अशा प्रकारे वीस जणांचा समावेश जिल्हा नियोजन समितीमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!