जामखेड नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी ॲंड. डॉ.अरुण(आबा) जाधव यांची एकमताने निवड

0
295

जामखेड न्युज – – – – –

 

ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या हॉलमध्ये नगर परिषद कर्मचारी यांची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये कर्मचारी संघटना तयार करण्यात आले, कारण भविष्यकाळाचा विचार करून सर्व कर्मचाऱ्यांना एकसंघ राहण्याची अत्यंत गरज आहे तरच आपल्याला कोठेतरी न्याय मिळाला जाईल, अन्यथा आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची हे नगरपरिषद पदाधिकारी पिळवणूक करत राहतील हे आपण मागील काही दिवसापासून अनुभवत आहोत त्यामुळे आज आपल्या संघटनेची घोषणा करून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नावे प्रसिद्ध करण्यात येत आहे असे सतिश डिसले यांनी सांगितले.

यावेळी संघटनेचे नाव जामखेड नगर परिषद कर्मचारी संघटना असे देण्यात आले तरी सर्वानुमते संघटनेचे अध्यक्ष ॲंड डॉ. अरुण (आबा) जाधव, कार्याध्यक्ष सुनील राऊत, उपाध्यक्ष सतीश डिसले, सचिव उमेश राऊत, सहसचिव रामेश्वर नेटके, खजिनदार अशोक सदाफुले, सदस्य ईश्वर माळी सदस्या मंदा मोरे, सीमा गायकवाड, सारिका आखाडे, सुधाबाई सदाफुले, असे 11 सदस्यांची सर्वानुमते निवड करण्यात
यावेळी जामखेड नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ॲंड. डॉ .अरुण जाधव बोलताना म्हणाले की ही संघटना मजबूत व धारदार शस्त्रा सारखी होणे गरजेचे आहे कारण आपण गाव स्वच्छ करतो रोज सकाळी पहाटे 5:00 वाजता उठून स्वच्छता करतो तरी देखील आपला कोठेच विचार केला जात नाही, हे मात्र आपल्या नशिबी खूप मोठे दुर्दैव आहे. ऐन सणासुदीच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात नाही. त्यांना आरोग्याच्या कोणतेही सुविधा पुरवल्या जात नाही कोरोनाच्या काळामध्ये माझ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना आजारांमध्ये मयत झालेल्या व्यक्तींची उचलून नेऊन दफनविधी करण्यात आले त्यांच्या आरोग्याची कोणी काळजी घ्यावयाची हे नगरपरिषदने विसरता कामा नये,
याठिकाणी अधिकारी तुपाशी आणि माझे कर्मचारी उपाशी हे मी कधीच सहन करू शकणार नाही या माझ्या गोरगरीब कष्टकरी कर्मचाऱ्यांसाठी जेलमध्ये व तडीपार होण्याची वेळ आली तरी मागे घेणार नाही माझा जन्मचं वंचितांसाठी झाला आहे वर्षभरापासून आपण वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहोत तरी देखील या नगर परिषद पदाधिकारी व सरकारला जाग येत नाही आपण कर्मचारी याच गावचे वतनदार आहोत अधिकारी फक्त दोन वर्षासाठी असतात त्यांना हाकलून लावण्याची ताकद आपल्यात आहे हे मात्र अधिकाऱ्यांनी विसरून जाऊ नये आपल्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी आपण भविष्यकाळात मोठा लढा उभा करणार आहोत यासाठी मी रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी अहोरात्र तुमच्या पाठीशी उभा राहील व माझी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो,
यावेळी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले, उपस्थित अरुण (भाऊ) डोळस, अमित जाधव, बंडू बोराडे, बाळू मेह्त्रे, गोरख मेह्त्रे, अनिल आरेकर, संतोष पवार, विद्या गायकवाड, आशा सदाफुले, राजू माळी, भास्कर लोंढे, सतीश कंगणे, मंदा मोरे, उषा अडागळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केले व सर्वांचे आभार सीमा गायकवाड यांनी मानले,

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here