जामखेड प्रतिनिधी
आपल्या जामखेड ग्रामीण रुग्णालयात आज ३१ जानेवारी २०२१ पल्स पोलीस डोस देण्यात आले आहे यावेळी जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या शुभहस्ते डोस देण्यात आले यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील बोराडे, डॉ.कुंडलीक अवसरे, डॉ. शिंदे , श्याम जाधवर, मिथुन बाफना, अधिपरिचारिका सातपुते, माळी, बारसे सिस्टर आदी उपस्थित होते पाच वर्षा च्या आतील मुलांना पोलीओ ढोस देण्यात आला आहे अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय वाघ यांनी दिली.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहिर आवाहन करण्यात येत आहे की, 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांच्या पालकांना जाहीर आवाहन करण्यात येते की आपल्या बालकांना पोलिओ चा डोस न चुकता दिनांक ३१/०१/२०२१ रविवार
आपल्या जवळच्या बुथवर अंगणवाडी, शाळा
बस स्टँड, रेल्वे स्टेशन, टोलनाके, सर्व रुग्णालय,
प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र या सर्व
ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष डोस पाजून घ्या ।
१) बाळ नुकतेच जन्मलेले असेल
२) या पूर्वी डोस
दिला असेल तरीही
३) बाळ आजारी असेल तरीही वैद्यकीय
अधिकारी यांच्या सल्ल्याने द्यावा
४) (वय वर्ष ० ते ५ सर्व बालके) न चुकता डोस घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.