जामखेड प्रतिनिधी
स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड साठी स्वच्छ सर्वेक्षण अभियान जामखेड शहरात सुरू आहे. आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी जामखेड शहराचा स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या पाच शहरात जामखेड शहराचा समावेश करण्यासाठी कंबर कसली आहे शहरातील कचरा संकलन करताना सुलभ व्हावे म्हणून सामाजिक कार्यकर्ते रमेश ( दादा ) आजबे यांनी शहरात मोठय़ा शंभर डस्टबीनचे वाटप केले आहे. तर लवकरात लवकर पंधराशे डस्टबीन वाटण्यात येणार आहेत.

स्वच्छतेच्या बाबतीत जामखेड शहराचा शेवटून पाचवा क्रमांक लागतो. गलिच्छ, अस्वच्छ शहर म्हणून जामखेड ओळखले जाते हि ओळख पुसून स्वच्छ व सुंदर जामखेड हि ओळख निर्माण करण्यासाठी व स्वच्छतेच्या बाबतीत पहिल्या पाच शहरात जामखेडचा क्रमांक आणण्यासाठी आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी कंबर कसली असून प्रभाग वार बैठक, शासकीय निमशासकीय संस्थांचे सहकार्य, विद्यार्थी, महिला व नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नगरपरिषदेमार्फत शहरातील ओला व सुका कचरा वेगळा करून प्रक्रिया करण्यात येणार आहेत. कचरा साठवण्यासाठी अनेक ठिकाणी अडचणी येत होत्या त्यामुळे रस्त्यावर कचरा पडत होता हि अडचण ओळखून सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी व्यापारी वर्गाला शंभर डस्टबीनचे वाटप केले आहे त्यामुळे त्यांचा कचरा रस्त्यावर येणार नाही. मोठ्या डस्टबीन प्रभाग पाच मध्ये साठ तर प्रभाग वीस मध्ये चाळीस डस्टबीनचे वाटप केले आहे तसेच लवकरात लवकर परत 1500 डस्टबीन वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये प्रभाग पाचमध्ये 750 व प्रभाग वीस मध्ये 750 डस्टबीन वाटप करण्यात येणार आहे. यामुळे कचरा रस्त्यावर न येता डस्टबीन मध्ये साठवण्यात येईल. यामुळे स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड साठी मोठी मदत होणार आहे. आजबे यांची शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले आहे तसेच अनेक ठिकाणी रस्ते, वीज व पाण्याची सोय केली आहे. आजबे यांच्या सामाजिक कार्यामुळे सर्व सामान्य जनता, विद्यार्थी व नगरपरिषद यांना मोठा फायदा होत आहे.