जामखेड प्रतिनिधी
स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड साठी स्वच्छ सर्वेक्षण व माझे वसुंधरा अभियान जामखेड नगरपरिषदेमार्फत सुरू आहे. पहिल्या पाचमध्ये नंबर आणण्यासाठी आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी कंबर कसली आहे व जामखेड मधिल जनतेला प्रत्येकाने एक झाड देण्याचे आवाहन केले होते याला प्रतिसाद देत सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी नगरपरिषदेला 500 झाडे दिली आहेत. त्यामुळे हरित जामखेड साठी मदत होईल.

सध्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत जामखेड नगरपरिषदेने सहभाग घेतला आहे. सध्या जामखेड शहराचा नंबर शेवटच्या पाचमध्ये आहे. तो पहिल्या पाच मध्ये आणण्यासाठी आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी कंबर कसली आहे व स्वच्छता अभियान सुरू केले आहे. स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड साठी शहरातील रस्ते, शासकीय कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली आहे. हळदी-कुंकू कार्यक्रमात सुनंदाताई पवार यांनी वाण म्हणून प्रत्येकाने एक देशी झाड द्यावे असे आवाहन केले होते. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते व सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी जामखेड नगरपरिषदेला 250 पिंपळाची झाडे व 250 वडांची झाडे दिलेली आहेत. तसेच जांबवाडी येथे शंभर झाडांची तसेच कोल्हेवाडी येथे शंभर झाडांची लागवड केली आहे.

आजबे यांची महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मागील वाढदिवसानिमित्त आजबे यांनी ल. ना. होशिंग विद्यालयाच्या समोर वृक्षारोपण केले होते व उन्हाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा केला संरक्षक जाळी बसवली त्यामुळे झाडे डेरेदार झालेली आहेत. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराशेजारील रस्त्याच्या कडेला वृक्षारोपण करून संरक्षक जाळी बसवली व आता नगरपरिषदेला 500 झाडे दिलेली आहेत.
रमेश आजबे यांनी जामखेड शहरात अनेक समाजोपयोगी कामे पदरमोड करून केलेली आहेत. बीड रोड पासून ल. ना. होशिंग विद्यालय व जामखेड महाविद्यालय हा अनेक वर्षांपासून बंद असलेला रस्ता मोकळा करून त्यावर पेव्हिंग ब्लाॅक टाळल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा खुपच फायदा झाला आहे. एक ते दीड किलोमीटर अंतर वाचलेले आहे. तसेच ल. ना. होशिंग विद्यालयाच्या समोर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आजबे यांनी वृक्षारोपण केले व या झाडांना संरक्षण जाळी बसवली व संपूर्ण उन्हाळ्यात स्वतः टॅकरद्वारे पाणी घातले यामुळे आता ही झाडे चांगले झाले आहेत. तसेच जिजाऊ नगरमध्ये रस्ता तयार करून बंदिस्त गटारे बांधकाम केले यामुळे येथील दुर्गंधी नष्ट झाली आहे.
ग्रामीण रुग्णालयात बोअरवेल घेतल्याने रूग्ण, नातेवाईक व कर्मचार्यांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. यामुळे रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आजबे यांचे आभार मानले. या सर्व कार्याची दखल घेत आमदार रोहित पवार यांनी आजबे यांची ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या नियामक मंडळावर नेमणूक केली आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आता सुंदर जामखेड हरित जामखेड करण्यासाठी आजबे यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून नगरपरिषदेलाही झाडे दिलेली आहेत.