नाबर्ड योजनेंतर्गत मुंजेवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना श्रमदान शिबीर संपन्न

0
217
जामखेड प्रतिनिधी
राष्ट्रीय सेवा योजना महासंस्कार श्रमदान सोहळा चा शुभारंभ मुंजेवाडी येथे नाबार्ड प्रोजेक्ट च्या माध्यमातून करण्यात आला. श्रमदानासाठी करमाळा, सातारा , फलटण , सिन्नर , मुंबई, पुणे ,अकलूज,दहिवडी या विभागातून श्रमदानासाठी 150 मुले मुली उपस्थित होते.
     यकार्यक्रमाचे उदघाटन आदरणीय सुनंदाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम समनव्यक प्राचार्य डॉ.सुधीर इंगळे, प्रा.लक्ष्मण राख सर , प्रा.प्रकाश निंबाळकर सर, कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था चे महाव्यवस्थापक डॉ.संतोष देशमुख सर , प्रकल्प समनव्यक सुशांत जगताप , आकाश घोडके , अमित पवार , विनय डुकरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उदघाटन समस्त मुंजेवाडी व जवळा गावकऱ्यांच्या उपस्थित झाले. यावेळी जलदिंडी चे भव्य नियोजन करण्यात आले. आदरणीय सुनंदाताई पवार यांनी गावकर्यांना श्रमसंस्कार वर संबोधित केले मुंजेवाडीमध्ये  27 जानेवारी रोजी
    श्रमदान सोहळ्याच्या पहिला दिवशी  माजी राष्ट्रीय सेवा योजना मधील मुलांनी प्रथमतः सकाळी 6.3० वाजता संपूर्ण गावात प्रभातफेरी काढण्यात आली.त्यांनतर श्रमदान करण्यासाठी सर्व गावकरी व मुले उपस्थित झाले. गावातील व राष्ट्रीय सेवा योजनामिळून  200 लोकांनि श्रमदान केले. श्रमदानासाठी जामखेड तालुक्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी उपस्थिती दाखवली. व श्रमदान करून गावकर्यांना प्रोत्साहित केले. गावकऱ्यांनी एकत्र येऊन केलेल्या या कामाचे पोलीस निरीक्षक यांनी कौतुक केले. व पुढील कामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमासाठी शिवराज देवमुंडे , प्रदीप दळवी, बबन ठकाण (सरपंच) , बाजीराव खाडे (उपसरपंच) , बाबसाहेब महारणवर ,समीर शेख, नय्यूम शेख ,प्रल्हाद झारगड तुळशीराम मोरे , शीतलताई झारगड , चेअरमन पोपट बारस्कर, भाऊ भोसले , बाळू बारस्कर समस्त जवळा, मुंजेवाडी खुंटेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here