नगरपरिषदेच्या थकित भाड्यासाठी मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची धडक कारवाई दोन दिवसात पाच लाख अकरा हजारांची वसुली

0
392
जामखेड  प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषद हद्दीतील व्यावसायिक व रहिवासी असा थकित कर बाकी सुमारे सव्वा आठ कोटी च्या आसपास असुन त्यामुळे नगरपरिषदेच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला होता नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण होत होत्या यासाठी मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची दोन दिवसांपासून कर वसुलीची मोहीम हाती घेतली व दोन दिवसात सुमारे पाच लाख अकरा हजार रुपयांचा कर वसुल केला आहे. व हि वसुलीची मोहिम सुरूच राहील असे जामखेड न्युजशी बोलताना दंडवते यांनी सांगितले.
     नगरपरिषदेच्या हद्दीतील व्यावसायिक गाळे धारकांकडे
सुमारे आठ ते नऊ वर्षांपासूनचे भाडे थकीत होते एका एका गाळे धारकांकडे साठ ते सत्तर हजार रुपये थकित होते कधीही कर भरलेला नव्हता. या सर्व गाळे धारकांना
नोटीसा पाठविल्या व जे भरणार नाहीत असे गाळे सील करण्यास सुरुवात केली त्यामुळे गाळे धारकांनी थकीत भाडे भरण्यासाठी सुरूवात केली.
दि २८ जानेवारी रोजी १४९१०० रुपये वसुली तर दि. २९ जानेवारी रोजी ३६२००० रूपये असे एकुण ५ लाख अकरा हजार शंभर रुपये दोन दिवसात वसुल करण्यात आले आहेत. वसुली मोहीम अशीच सुरू राहिल असे दंडवते यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.
    वसुली पथकात मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, विष्णू भिसे, रामराव नवगिरे, राजेंद्र गायकवाड, अविनाश साबळे, सिद्धेश मुळे, अतुल कोकाटे, अभिजित भैसाडे, प्रमोद टेकाळे, लक्ष्मण माने, निवृत्ती चव्हाण, विजय  पवार, संजय खेत्रे, उमेश राऊत, हितेश वीर, रज्जाक शेख, राम नेटके,संतोष अडाले, सय्यद वली, ऐयाज शेख,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व सर्व कर्मचारी स्टाफ उपस्थित होते.
         चौकट
जामखेड नगरपरिषद हद्दीतील व्यावसायिक व घरगुती अशी मोठी थकबाकी आहे. त्यामुळे सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण होतात. सर्व नागरिकांनी आपआपली थकबाकी भरावी त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यास सुलभ होईल कर रूपाने गोळा होणारा पैसा सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वापरला जातो सर्व हिशोब नगरपरिषद कार्यालयात असेल तेव्हा थकबाकी धारकांनी ताबडतोब आपआपली थकबाकी भरावी नगरपरिषदेस सहकार्य करावे जे थकबाकी भरणार नाहीत अशा थकबाकी धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. गाळे सील करण्यात येतील.
   मिनीनाथ दंडवते – मुख्याधिकारी जामखेड नगरपरिषद जामखेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here