मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्ताने बहारदार कविसंमेलन.

0
207

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्ताने बहारदार कविसंमेलन.

जामखेड प्रतिनिधी
दि-28 रोजी मराठी साहित्य प्रतिष्ठान जामखेड आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कवी संमेलनाचे आयोजन नागेश विद्यालय जामखेड येथे करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष नामवंत कवी नागेश शेलार होते. काव्य संमेलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. कवींनी वेगवेगळ्या विषयावर कविता सादर करून काव्य संमेलन चांगलेच रंगवले. उपस्थितांनी ही सर्व कवींना दाद दिली. यावेळी कवी इंद्रकुमार झांजे यांनी ‘गावाचं गावपण’, कवी हरीश हातवटे यांनी ‘तुमच्यासाठी कायपण’, कवी किसन आटोळे यांनी ‘नको करू रे व्यसन’ , कवयित्री संगीता होळकर यांनी शिवरायांचे मावळे , कवी डॉ. संजय राऊत यांनी मिसळ व पाव, कवी डॉ. जतिन काजळे यांनी दिवाळीत माहेरची आठवण, कवी रंगनाथ राळेभात यांनी कोरोना ,कवी कुंडल राळेभात यांनी अंधश्रद्धा, कवी वराट यांची शेतीवर कविता, तसेच नागेश कॉलेज व कन्या विद्यालयातील कु.कदम निकिता, कु.प्रतिक्षा नेटके, कु.शेख सानिया, कु. पूजा गदादे, कु.सानप या विद्यार्थ्यांनी काव्यवाचन केले. कवी नागेश शेलार यांनी समाजातील ज्वलंत प्रश्नावर ‘कुठल्याच गावाचे रस्ते’ ही कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. व अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.आ.य.पवार यांनी कवितेविषयी मार्गदर्शन केले. कविता कशी जन्माला येते. कवितेत समाजाचं प्रतिबिंब असते. सर्वांनी मराठी भाषा संवर्धन केली पाहिजे. आपली भाषा आपला अभिमान आहे. हे त्यांनी सांगितले.

 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नागेश शेलार यांचा सत्कार श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्कूल कमिटीचे अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांनी केला. यावेळी हरिभाऊ बेलेकर, प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा डॉ.विद्या काशीद , डॉ.सविता राऊत, बोलभट सर, प्रा. प्रकाश तांबे, बाळासाहेब आंधळे , प्रा.ज्योती गर्जे, प्रा. प्राची डहाळे, सर्व शिक्षक, विद्यार्थी, शैक्षणिक कार्यकर्ते उपस्थित होते. या संमेलनात कडा आष्टी जामखेड कर्जत येथील सतरा कवींनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन प्रा. मोहनराव डूचे व कवी हरीश हातवटे यांनी केले. तर आभार प्रा.सखाराम सप्रे सर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here