जामखेड न्युज – – –
पुण्यातील बाणेर परिसरातील हायस्ट्रीट परिसरातून काही दिवसांपूर्वी स्वर्णम चव्हाण उर्फ डुग्गु याचे अज्ञाताने अपहरण केले होते. अखेर काल बुधवारी अपहरणकर्त्याने वाकड जवळील पुनावळे पुला जवळ सोडले. यानंतर त्याला पोलिसांच्या माध्यमातून सुखरूपपणे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
Advertisement 

स्वर्णम उर्फ डुग्गु सापडल्याने अख्या महाराष्ट्राला आनंद झाला, याच आनंदात नांदेडस्थित स्वर्णमची आत्या, आपले पती आणि दोन मुलांसह त्याला आणि चव्हाण कुटुंबाला भेटण्यासाठी पुण्याकडे जात असताना रात्रीच्या सुमारास नगर शहराजवळ इंद्रायणी हॉटेल इथे त्यांच्या वाहन डिव्हायडरला धडकल्याने झालेल्या अपघात झाला आणि दुर्दैवाने यात डुग्गुची आत्या सुनंदा संतोष राठोड (वय- 36, रा-नांदेड) यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्यांचे पती संतोष राठोड हे किरकोळ जखमी असून दोन मुले मात्र हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे.
डुग्गुची अपघातात मृत झालेल्या आत्याचे शवविच्छेदन अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आले. यावेळी उपस्थितीतांना अश्रू अनावर झाले होते.
याबाबत अहमदनगरच्या कॅम्प पोलीस ठाण्यात अपघात आणि अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.