जामखेड प्रतिनिधी-
अपघातातील जखमींना मदत करणे असेल, निराधारांना मदत करणे असेल अशा कामांमधून सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी स्वताची वेगळीच ओळख निर्माण केली असल्याचे गौरोदगार जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.सुनील पोखरणा यांनी व्यक्त केले आहेत.
बुधवारी ( दि. २७ ) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुनील पोखर्णा यांनी जामखेड येथे कोठारी प्रतिष्ठाणला भेट दिली.यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांचा प्रतिष्ठाणच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ ,जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी ,वैद्यकीय अधिकारी डॉ शिंदे ,वैद्यकीय अधिकारी डॉ कुंडलिक अवसरे ,प्रवीण मंडलेचा, डॉ भरत दारकुंडे ,महेश धसे, खंडू खाडे, दीपक मोरे उपस्थित होते.
यावेळी डाॅ.पोखरर्णा यांनी जामखेड ग्रामीण रूग्णालयात जास्तीच्या आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. म्हणजे डॉक्टर आणि सर्व सुविधा जामखेडलाच मिळतील असा प्रयत्न करणार आहे.