जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
एच. यु. गुगळे क्लाॅथ मर्चंटचे मालक दिलीप गुगळे यांनी परिसरातील गोरगरीब मुलांसाठी ग्राहकांच्या मार्फत कपडे वाटपाचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे यामुळे गोरगरीब मुलांना नवे कपडे मिळाल्याने चिमुकल्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. एच. यु. गुगळे यांच्या अभिनव उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एच. यु. गुगळे क्लाॅथ मर्चंटचे मालक रमेश गुगळे व दिलीप गुगळे यांनी आपल्या समाजसेवेचा आदर्श वसा जपला आहे. दुकानात येणाऱ्या ग्राहकांकडे लहान मुलांसाठी गणवेश दिले जातात व ग्राहकांना सांगितले जाते की, तुमच्या परिसरातील गरजू गरीब मुलांना हे कपडे द्या या उपक्रमामुळे परिसरातील अनेक गरजू मुलांना नविन कपडे मिळत आहेत.
सध्या जामखेड साकत रस्त्याचे डांबरीकरण काम सुरू आहे या कामावर खडी फोडण्यासाठी मध्यप्रदेशातील अदिवासी मजूर मोठ्या प्रमाणावर आहेत. एका महिन्यांपासून ते या रस्त्यावर काम करत आहेत त्यांच्याकडे लहान मुलेही आहेत तेव्हा असाच गुगळे यांच्या दुकानातून मिळालेला गणवेश रस्त्यावर खडी फोडणाऱ्या अदिवासी मुलांना वाटप करण्यात आला त्यावेळी चिमुकल्याचा चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता.