जामखेड न्युज – – – –
पिंपरीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पिंपरीतील फुगेवाडी ते संत तुकाराम नगर असा मेट्रो प्रवास आज केला. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शरद पवार हे फुगेवाडी येथे आले होते, याची माहिती प्रसारमाध्यमांना नव्हती. तसेच, स्थानिक पदाधिकाऱ्यांना देखील याची माहिती ऐनवेळी सकाळी देण्यात आली होती. असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले. दरम्यान, शरद पवार यांनी दीड तास थांबून मेट्रोची सविस्तर माहिती घेतली.
पिंपरीतील मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आहे. आज शरद पवार यांनी सकाळी साडेनऊ च्या सुमारास फुगेवाडी येथील मेट्रो स्थानकाला भेट देऊन फुगेवाडी ते संत तुकाराम नगर असा मेट्रो प्रवास केला. दरम्यान, मेट्रोला भेट देणार असल्याची माहिती त्यांनी कोणालाच दिली नव्हती. ऐनवेळी शरद पवार येणार आहेत अशी माहिती स्थानिक आमदार आणि शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना देण्यात आली. शरद पवार यांनी दीड तास थांबून मेट्रो विषयी सर्व माहिती घेतली असे वाघेरे यांनी सांगितलं आहे.