अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात उद्यापासून सुरु होणार ‘ह्या’ शाळा !

0
296
जामखेड न्युज – – – – – 
कोरोना निर्बंधांमुळे शाळा कॉलेजे बंद करण्यात आले आहे. यातच एक महत्वाची माहिती समोर येत आहे. नगर जिल्ह्यात सोमवार, 17 जानेवारीपासून इंग्रजी शाळांचे वर्ग सुरू होणार असल्याचे महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राज्य शासनानेही याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे निवेदन संघटनेने जिल्हा प्रशासनाला दिले आहे. वाढत्या करोना संसर्गामुळे राज्य सरकारने 8 जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळा या बंद केल्या आहेत.
सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनने राज्यातील सर्व संस्था चालकांची 11 आणि 12 जानेवारीला बैठक बोलावली होती.
दरम्यान या बैठकीत दोन वर्षापासून करोनामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या झालेल्या शैक्षणिक नुकसानीवर चर्चा झाली.
करोना रुग्ण नसणार्‍या भागात शासनाने ठरवून दिलेल्या नियमानूसार आणि पालकांच्या संमतीनूसार शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
नगर जिल्ह्यात देखील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळा कोविड नियमांचे पालन करून सुरू ठेवणार आहेत. सोमवारपासून राज्यातील सर्व संस्था चालकांनी इंग्रजी शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात नगरचाही समावेश आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here