जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
परिसरातील सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरूणांनासाठी सुवर्णसंधी आहे भरती पुर्व मार्गदर्शन १४ जानेवारी रोजी नायगाव येथे भरतीपूर्व मार्गदर्शन कॅप्टन लक्ष्मण भोरे हे करणार आहेत तरी परिसरातील तरूणांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT 

केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे!!! उठ युवका जागा हो हाती घेऊनी धगधगती ज्वाला हो!!! सर्व ई. 10 वी 11 वी व ई. 12 वी तील तरुण वर्गांना व त्यांच्या पालकांना सुचित करण्यात येते की दिनांक 14 जानेवारी 2022 वार शुक्रवार ठीक सकाळी 8:30 वाजता नायगाव या ठिकाणी येणाऱ्या पुणे ARO च्या भरती संदर्भात मोफत करिअर मार्गदर्शन होणार आहे. तरी आसपासच्या गांव नाहूली, देवदैठण, धामणगाव, घुलेवाडी, सतेवाडी, बांधखडक, आनंदवाडी, बाळगव्हाण, राजुरी, वनवे वस्ती, सर्व वाडी वस्तीवरील तरुणांनी याचा लाभ घ्यावा आपल्या सहा जिल्ह्याची भरती दि. 27 मार्च ते दि. 18 एप्रिल 2022 या वेळेत आहे. तरी या मार्गदर्शनात खालील विषयावर मार्गदर्शन केले जाईल.
विषय
(1) अभ्यास कसा करावा व नियोजन.
(2) नेमका सिलेबस काय असतो.
(3) आपण कुठे कमी पडतो.
(4) नेमके विद्यार्थ्यात काय पाहिले जाते.
(5) डॉक्युमेंट नेमके काय लागते.
(6) मेडिकल मध्ये काय पाहिले जाते.
या सर्व विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे व याचे नियोजन व आयोजन नायगाव चे मा.श्री भीमराव पाटील (प्रहार संघ ता. कार्याध्यक्ष जामखेड) व सरपंच:-अशोक तोंडे व सर्व ग्रामस्थ यांनी केलेले आहे. तरी जास्तीत जास्त तरुणांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
*स्थळ:-* श्री. नाथ मंदिर (सभामंडप) *नायगाव*
*वेळ:-* 8:30 ते 9:30
*व्याख्याते*
*कॅप्टन:- लक्ष्मण भोरे (सेवानिवृत्त)*
*शिवनेरी अकॅडमी जामखेड*
*टीप:-*
*(1) कोरोनाच्या नियमाचे पालन करावे*
*(2)सर्वांना मास्क अनिवार्य आहे*