जामखेड न्युज – – – –
जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मतावळी गावची लेक प्रतिभा बबन सांगळेने मिस महाराष्ट्रचा किताब मिळवला आहे. शेतकरी कुटुंबातील प्रतिभाने मिस महाराष्ट्राचा किताब मिळवल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मतावळी गावची कन्या प्रतिभा बबन सांगळेने मिस महाराष्ट्रचा किताब मिळवत बीड जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली.
प्रतिभा सध्या पोलिस दलात कार्यरत आहे. सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या प्रतिभाने मिळवलेले हे यश सांगळे कुटुंबीयांची मान अभिमानाने उंचावणार आहे. प्रतिभाला आधीपासूनच वेगळे करून दाखविण्याची इच्छा होती.