जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
कर्जत जामखेड चे लोकप्रिय आमदार माननीय रोहित दादा पवार यांच्या संकल्पनेतून “माझं जामखेड माझी जबाबदारी” व “होय जामखेड बदलतंय” या उपक्रमांतर्गत तसेच पोलीस रेझिंग डेच्या निमित्ताने “युवा संवाद” हा कार्यक्रम ल.ना होशिंग विद्यालयांमध्ये जुनियर कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता. यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून जामखेड पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक सुरक्षा राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मुलींनी व महिलांनी आम्हाला आपला मोठा भाऊ समजावे , आम्ही मदतीसाठी सदैव तयार आहोत. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक आहे ,मनावर नियंत्रण असल्यावर चुकीचे कृत्य घडत नाही असे प्रतिपादन जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले.
ADVERTISEMENT

यावेळी बोलताना गायकवाड साहेबांनी अनेक सुंदर विषय हाताळले. त्यापैकी व्यसन, तरुण तरुणींमध्ये फोफावत चाललेला सोशल मीडियाचा अतिरेक, मुलींची छेडछाड, करियर आणि ध्येय निश्चिती, कोविड तसेच रोहित दादा जामखेडसाठी जे काही विद्यार्थ्यांसाठी उपक्रम राबवत आहेत या विषयाचा समावेश होता. यावेळी सर्व विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे विद्यार्थिनी मध्ये पोलिसांबद्दल एक सकारात्मक संदेश गेला. यावेळी ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, उपप्राचार्य पोपट जरे, जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड साहेब, युवा उद्योजक मा. प्रवीण दादा उगले डिजिटल मीडियाचे दिपक घोडके, कर्मचारी आणि शिक्षक वृंद उपस्थित होते
सामाजिक सुरक्षा राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मुलींनी व महिलांनी आम्हाला आपला मोठा भाऊ समजावे , आम्ही मदतीसाठी सदैव तयार आहोत. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक आहे ,मनावर नियंत्रण असल्यावर चुकीचे कृत्य घडत नाही असे प्रतिपादन जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले.
विद्यार्थ्यांनी वाईट व्यसनापासून दूर राहावे तसेच वाईट ग्रुपच्या संगतीत न जाता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून देशहिताचे कार्य करावे तसेच विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या मार्गदर्शनासाठी ही आम्ही मार्गदर्शन करू , विद्यार्थिनीच्या सुरक्षितेसाठी 10 91 तसेच 100 नंबर डायल करून आम्हाला माहिती कळवावी.
विद्यार्थिनीने भरोसा पेटीचा उपयोग कोणी जर त्रास देत असेल किंवा आपल्या मैत्रिणीला काही त्रास होत असेल तर त्याची माहिती भरोसा पेटी मध्ये टाकावे. गावात ,समाजात ,रस्त्याने, काही त्रास होत असल्यास भरोसा पेटीचा वापर करावा. सोशल मीडियाद्वारे अनेक फसवणूक होत असते त्या संदर्भात आपल्याला कायद्याचे संरक्षण आहे. विद्यार्थी जीवनात मोबाईलचा अनावश्यक वापर टाळावा व वाचन संस्कृती जपावी , एनसीसीचे एकता व अनुशासन कौतुकास्पद आहे. असे मनोगत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले.