जामखेड न्युज – – –
आज सकाळी लातूर-अंबाजोगाई (Latur- Ambajogai Road) रस्त्यावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT

लातूर औरंगाबाद ही बस लातूरमधून निघाली होती तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाईहून लातूरकडे जात होता. बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावर हा भीषण अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही मात्र हा अपघात इतका भीषण होता की जागीच सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर इतर गंभीर जखमी झाले आहेत.