जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवदैठण येथिल पाचवीतील विद्यार्थी रोहन भोरे याने यश संपादन केले आहे. त्याच्या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले आहे.
ADVERTISEMENT 

पाचवीतील रोहन रघुनाथ भोरे याने २३६ गुण मिळवत अहमदनगर जिल्हा गुणवत्ता यादीत शंभरावा क्रमांक पटकावला आहे. मुख्याध्यापक आनंद राऊत सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तसेच वर्गशिक्षक गाडे सर, पवार सर, गर्जे सर, मनोज दळवी सर, गुजर मॅडम यांनीही मार्गदर्शन केले.
त्यांच्या यशाबद्दल पालक, शिक्षक व परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात अभिनंदन केले आहे. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.