जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
तालुक्यातील झिक्री शाळा आठ दिवसांपासून वेगवेगळ्या आंदोलनामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी सरपंच व काही ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले होते. तरीही प्रशासनाला वेळेत न कळल्यामुळे कामात हलगर्जीपणा केला आहे तेव्हा शिक्षक, शिक्षिका व केंद्रप्रमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी झिक्री येथील युवा नेते ऋषिकेश साळुंके यांनी निवेदनाद्वारे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यामुळे आठ दिवसांच्या आत दुसर्यांदा शाळा आंदोलनामुळे वादाच्या भोवर्यात सापडली आहे.
झिक्री शाळेच्या मुख्याध्यापिका मनमानी कारभार करतात सरपंच व ग्रामस्थ, पालकांना विश्वासात घेत नाहीत. त्यांची बदली करावी म्हणून 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती दिवशीच सरपंच नंदा साळुंके व काही नागरिकांनी शाळेला कुलूप ठोकले होते. दि. ६ रोजी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी झिक्री येथे भेट देत आंदोलनकर्ते यांच्याशी चर्चा केली होती व आंदोलन मिटवले होते.
ADVERTISEMENT 

सरपंच व ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकल्याची रितसर खबर गटशिक्षणाधिकारी यांना देणे आवश्यक होते पण संबंधित शिक्षकांनी दोन दिवस झाले तरी लेखी कळवले नव्हते. म्हणून शिक्षक व केंद्रप्रमुख यांनी कामात हलगर्जीपणा केलेला आहे तेव्हा त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी युवा नेते ऋषिकेश साळुंके यांनी निवेदनाद्वारे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या व वंचित घटकाच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महान अशा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिवशी शाळेला कुलूप यामुळे झिक्री शाळा चांगलीच चर्चेत आली होती. आता परत शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्या निलंबनासाठी निवेदन यामुळेच परत शाळा चर्चेत आली आहे.
गावचे राजकारण शाळेत आले की मुख्याध्यापिका मनमानी करतात हा प्रश्न सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे.