जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – ( सुदाम वराट)
वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत नविन मराठी शाळेने आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यामुळे शाळेचे सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
इयत्ता 5 वी गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी
१.अनुष्का मोळवणे
२.इंद्रजीत दळवी
३.पंकज खंडागळे
४.ऋषिकेश पवार
५.संध्या गाडे
६.तेजस गुगळे
इयत्ता 8 वी गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी
१.रिया राठोड
२.अविष्कार दळवी
३.गार्गी राळेभात
४.अथर्व परदेशी
५.अनघा कुलकर्णी
ADVERTISEMENT 

इयत्ता 5 वी या वर्गास मार्गदर्शन करणाऱ्या श्रीम.देशमुख मॅडम, श्रीम. महाजन मॅडम व श्रीम. वाघ मॅडम, तसेच इयत्ता 8 वी या वर्गास मार्गदर्शन करणारे श्री हजारे सर, श्रीम. पवार मॅडम व बांगर सर तसेच सर्व यशस्वी विद्यार्थी व पालक यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. राळेभात एम.के.व संस्थेचे सचिव श्री. राजेंद्र देशपांडे ,कोषाध्यक्ष श्री. उमेश देशमुख अभिनंदन केले.
एप्रिल २०२१ मध्ये झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नवीन मराठी ( लोकमान्य) शाळेचे पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ९ विद्यार्थी परिक्षेस बसले होते त्यापैकी ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी ५ विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले आहेत.