जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शहर व तालुक्यातील पत्रकारांचा प्रशासन व राजकीय पक्षाकडून गौरव करण्यात आला तसेच कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व सृजण फौंडेशनच्या वतीने तसेच भाजपाच्या वतीने गौरव करण्यात आला.
जामखेड येथील महावीर भवनमध्ये
कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व सृजन फौंडेशनच्या वतीने संचालिका सुनंदाताई पवार यांनी तालुक्यातील सर्व पत्रकारांचा व कुटुंबाचा केशर आंब्याचे रोप व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना सुनंदाताई पवार म्हणाल्या पत्रकारीतेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी शिक्षण घेत असताना वयाच्या २० व्या वर्षापासून दर्पण हे वृत्तपत्र चालू करून समाजाच्या समस्या मांडून जनजागृती होईल व इंग्रजांना ते समजावे म्हणून एकाच पानावर मराठी व इंग्रजीच मजकूर छापला.
दर्पण हा शब्द संस्कृत भाषेतील आहे. दर्पण म्हणजे आरसा. आरशामध्ये जे काही आपण पाहतो ते ओरीजिनल रूपात आपल्याला दिसते. त्यामुळे पत्रकार दर्पणच्या प्रमाणे आपली प्रतिमा कशी चांगली ठेवता येईल याचा प्रयत्न करून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, प्रशासन यांचे कामे समाजा समोर आणून त्या सर्वांचा सन्मान करते. समाजातील घडत असलेल्या चांगल्या घटना व कामे समाजासमोर आणने व त्या लोकांना ताकद देण्याचे काम पत्रकारांचे आहे. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सहा जानेवारीला पत्रकारदिन साजरा केला जाते तसे तर पत्रकार दररोज तसा पात्र असतो परंतु ६ जानेवारी हा त्यांच्या हक्काचा दिवस सरकारने जाहीर केला आहे असे सुनंदाताई म्हणाल्या.
ADVERTISEMENT 

पंचायत समिती सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकारांचा गौरव करण्यात आला यावेळी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष अजय काशिद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे, बबन काका काशिद, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पै.शरद कार्ले, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभिषण धनवडे, प्रविण सानप, डॉ. विठ्ठल राळेभात, मनोज कुलकर्णी, गोरख घनवट, डोंगरे यांच्या सह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
जामखेड पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, जामखेड तहसील कार्यालयात तहसीलदार योगेश चंद्रे व रेणुकामाता मल्टिस्टेट संस्थेत शत्रुघ्न वराट यांनी पत्रकारांचा गौरव केला.
यावेळी जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपक देवमाने, ज्येष्ठ पत्रकार अशोक निमोणकर, दत्तात्रय वडे, वसंत सानप, मिठूलाल नवलाखा, सुदाम वराट, मोहिद्दीन तांबोळी, प्रकाश खंडागळे, यासीन शेख, अविनाश बोधले, ओंकार दळवी, विजय अवसरे, दत्ता राऊत, संजय वारभोग, लियाकत शेख, धनराज पवार, विजय अवसरे, शिवाजी इकडे, किरण रेडे, फायकभाई शेख, सचिन अटकरे, संतोष गर्जे, संजय लहाने, जाकीर शेख यांच्या सह सर्वच पत्रकार उपस्थित होते.