जामखेड न्युज – – –
अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षकांचा जानेवारी-2022 मधील शिबीर कामकाज दौरा पुढीलप्रमाणे आहे. पाथर्डी येथे 6 आणि 27 जानेवारी, 2022 रोजी. श्रीगोंदा येथे 7 जानेवारी, शेवगाव शेवगांव येथे 10 आणि 29 जानेवारी, टाकळीढोकेश्वर येथे 11 जानेवारी, काष्टी येथे 12 जानेवारी, चौंडी येथे 13 आणि 31 जानेवारी, जामखेड येथे 18 जानेवारी, कर्जत येथे 24 जानेवारी आणि पारनेर येथे 25 जानेवारी
ADVERTISEMENT 

प्रत्येक तालुक्यात मासिक दौऱ्याचा दिवस हा वर नमूद दिनांकाप्रमाणे असेल. या दिनांकाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी किंवा शासकीय सुट्टी जाहीर झाल्यास तसेच प्रशासकीय कारणास्तव दौरा रद्द झाल्यास त्या दिवसाच्या मासिक दौऱ्याचे कामकाज दुसऱ्या सोयीस्कर दिवशी होईल व त्याची तारीख त्यावेळी जाहीर करण्यात येईल.
अर्जदारांची अपूर्ण कागदपत्रे स्विकारली जाणार नाही. कँम्पच्या कामकाजाबाबतचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने बंधनकारक भरणे आहे. कँम्पच्या ठिकाणी परराज्यातून आलेली वाहने तसेच बसेसची तपासणी करण्यात येणार नाही. ज्या तालुक्यात कँम्प आयोजित करण्यात आलेला आहे, त्या तालुक्यातील नागरिकांचेच कॅंम्पमध्ये कामकाज करण्यात येईल. शिबिर कामकाज ठिकाणी तपासणी होणा-या सर्व नवीन तात्पुरती नोंदणी झालेल्या परिवहनेतर संवर्गातील वाहनांचे डिस्क्लेमर असल्याशिवाय वाहनांची तपासणी करण्यात येणार नाही. संबंधितांनी याची नोंद घ्यावी असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अहमदनगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.