जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ज्ञानू उत्सव 2022 अंतर्गत ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरगाव येथे ज्ञान ज्योति सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण या अभियानातून घेण्यात आलेल्या 10 टॅब व प्रयोगशाळा साहित्य यांचा लोकार्पण सोहळा उद्योजिका सौ सुनिता दिलीप गुगळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याच प्रमाणे या अभियानांतर्गत गावात शैक्षणिक वातावरण निर्माण करणे मुलांच्या सदृढ आरोग्यासाठी पोषण परसबाग विकसित करण्यात आली आहे. शाळेचे रंग काम प्रगतिपथावर असून त्यामध्ये गणिताचे गाव, इंग्रजी चे गाव, ज्ञानाचे गाव तयार केले आहे. स्लॅब च्या इमारतीचे काम,हॅण्ड वॉश स्टेशन दुरुस्ती, विज्ञान प्रयोग शाळा व सुसज्ज वाचनालयाचे काम चालू आहे.
शाळेतील वर्गखोल्या व बोलक्या भिंती याचेही काम चालू आहे. VSTF मार्फत तीन लाख रुपये निधी शाळेला मिळालेला आहे. शाळेचे काम जास्तीत जास्त करण्याचे गावकऱ्यांनी ठरवले असून आत्तापर्यंत 70 हजार रुपये रोख सहभागही जमा केलेला आहे.
शाळेमध्ये आज सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली विद्यार्थ्यांनी भाषणे केले गावातील माजी शिक्षक मुख्याध्यापक चव्हाण विठ्ठल, ग्राम प्रवर्तक शिवाजी माने, मुख्याध्यापक भगवान समुद्र व कार्यक्रमा च्या अध्यक्ष सौ सुनीता गुगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेतील शिक्षिका सरिता मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले.
उद्योजिका सौ सुनिता दिलीप गुगळे यांनी शाळा विकासासाठी अकरा हजार रुपये रोख देणगी व नारायण थोरात 100रू.दिले
कार्यक्रम प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जनार्दन चव्हाण, सरपंच राधिकाताई चव्हाण, उपसरपंच सचिन ढवळे, सदस्य योगिता सपकाळ, ग्रामसेविका शेख मॅडम,सुनिता गुगळे, सुवर्णा सुरवसे, काकासाहेब चव्हाण, विठ्ठल चव्हाण, रंजना चव्हाण नवनाथ गोरे, हनुमंत गव्हाणे बबन वाघमारे, विलास समुद्र, सुभाष सपकाळ, नारायण थोरात, अंगणवाडीसेविका रंजना चव्हाण, संकेत आले आदी उपस्थित होते.