माजी मंत्री तानाजी सावंत शिवसेना सोडणार? भाजपमध्ये प्रवेशाची शक्यता!!!

0
308
जामखेड न्युज – – – 
शिवसेनेचे (Shiv sena) आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) पक्ष सोडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील काही दिवसांपासून ते पक्षावर नाराज आहेत. त्यामुळेच ते पक्ष बदलणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत. आज त्यांच्या पुण्यातील कात्रज येथील घरी भाजप नेते खासदार संभाजीराजे आले आहेत. त्या दोघांमध्ये मागील काही वेळापासून चर्चा सुरू आहे. त्यामुळे तानाजी सावंत हे आज नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तानाजी सावंत यांनी काल आपली पुढची राजकीय भूमिका घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांच्यासोबत त्यांची बैठक सुरू आहे. त्यानंतर अवघ्या काही वेळात ते आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.
कोण आहेत ताणाजी सावंत?
तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथील आहेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सावंत यांनी शिक्षण क्षेत्रासह, राजकारण आणि कारखानदारीत आपली कारकीर्द सिद्ध केली आहे. कार्यक्षेत्र म्हणून पुण्याची निवड करत जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात सोनारी येथे भैरवनाथ शुगर या खासगी साखर कारखान्याची उभारणी करीत त्यांनी साखर उद्योगात पाऊल ठेवले. सध्या भैरवनाथ शुगर कारखान्याचे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात पाच युनिट कार्यान्वित आहेत.
सध्या ते उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटेंचा पराभवाचा केला. परंतु, त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांना मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळेच ते शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. परंतु, ते नेमके कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here