शाखा अभियंता शशिकांत सुतार यांची उपअभियंता म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने सत्कार

0
265

जामखेड प्रतिनिधी

            जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
    जामखेड येथे शाखा अभियंता असणारे कार्यक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी शशिकांत सुतार यांची नुकतीच रत्नागिरी येथे पत्तन अभियंता खाण व संरक्षण विभाग भगवती बंदर रत्नागिरी येथे पदोन्नती झाली याबद्दल त्यांचा जामखेड पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
        यावेळी जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण, सचिव मिठुलाल नवलाखा, जिल्हा प्रतिनिधी यासीन शेख, खजिनदार सुदाम वराट, प्रसिद्धीप्रमुख धनराज पवार, नगर व्हिजनचे संपादक संजय वारभोग हजर होते.
      शशिकांत सुतार यांचे शालेय शिक्षण जामखेड येथेच झाले तर महाविद्यालयीन स्थापत्य अभियंता पदविका शिक्षण बीड येथे झाले. १९९७ मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून नगर येथे नोकरीस प्रारंभ झाला चार वर्षे नगर, चार वर्षे राहुरी, चार वर्षे श्रीगोंदे, परत सहा वर्षे नगर, व पाच वर्षे जामखेड येथे नोकरी केली. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी ख्याती आहे त्यामुळे अति महत्त्वाच्या नगर मुख्यालयी सहा वर्षे उत्तमपणे काम पाहिले.
        आता शाखा अभियंता पदावरून उपअभियंता पदी पदोन्नती मिळाली आहे ते आता रत्नागिरी येथे पत्तन अभियंता खाण व संरक्षण विभाग भगवती बंदर रत्नागिरी येथे पदोन्नती मुळे बदली झाली आहे त्यामुळे जामखेड पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here