देशात बूस्टर डोसला परवानगी, मात्र नेमका कधी घ्यावा?

0
257
जामखेड न्युज – – – – 
कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या वाढता प्रकोप पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशवासियांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी ओमायक्रॉनमुळे कोरोना योद्ध्यांना बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचं सांगितलं. हे बूस्टर डोस 10 जानेवारीपासून सुरू करण्याचंही त्यांनी बोलतांना जाहीर केलं आहे. त्यानुसार आता देशातील आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांवरील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस दिला जाणार आहे.
कोरोना काळात लसीकरण हे महत्वाचं शस्त्र असून सध्या सरकारकडून त्यावर भर दिलेला पाहायला मिळत आहे. अशातच आता भारतात बुस्टर डोस देण्याबाबत मोदींनी जाहीर केल्यानंतर भारत बायोटेकचे क्लिनिकल लीड डॉ. रॅशेस एल्ला यांनी ट्विट करत बुस्टर डोसबाबत माहिती दिली आहे.
लसीच्या दुसर्‍या डोसनंतर, तिसरा डोस दीर्घ अंतराने अधिक प्रभावी ठरतो. कारण तो जास्त काळ प्लाझ्मा आणि मेमरी सेल तयार करते म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती जास्त काळ टिकते. असं डॉ. रॅशेस एल्ला यांनी ट्विट करत म्हटलं आहे. डॉ रॅशेस एला म्हणाले की, दुसऱ्या डोसनंतर बूस्टर डोसचा 6 महिन्यांचं अंतर योग्य आहे. हे ओमिक्रॉनचा धोका कमी करण्यास देखील मदत करेल.
दरम्यान 3 जानेवारीपासून देशभरातील लहान मुलांचं कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांना लसीचा डोस दिला जाईल. सरकारच्या या निर्णयामुळे कोरोना विरोधातील लढाई आणखी मजबूत होईल. त्याचबरोबर शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंताही कमी होईल. असंही पंतप्रधान मोदींनी जाहीर यावेळी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here