जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
जामखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील धोत्री शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने गुटका साठ्यावर मारलेल्या छाप्यात तब्बल २ लाख ७६ हजार रुपयांचा गुटखा जप्त करत तीन जणांवर गुन्हा दाखल केला असून दोन गुटका तस्करांना अटक तर एक जण फरार झाला आहे.
सविस्तर असे की, जामखेड शहरानजीक असलेल्या धोत्री गावाच्या शिवारात एका इसमाच्या पत्र्याच्या शेडमध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात हिरा कंपनीचा सुंगधी तंबाखु मिश्रीत पानमसाला गुटखा ठेवला असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके व कर्जत विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना गुप्त माहिती मिळाली यावरून सदर ठिकाणी छापा मारण्यात आला यावेळी आढळून आलेला तब्बल २ लाख ७६ हजार रुपयांचे मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यानुसार कॉन्स्टेबल सागर जंगम यांनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामकिशन उर्फ बाबु उत्तम अडाले ( २६ ) सचिन निवृत्ती गायकवाड (३१) आणि संजय सुभाष जगताप ( फरार ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना पोलिसांनी अटक केली असून संजय सुभाष जगताप हा आरोपी फरार झाला आहे.
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके आणि उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत विभाग अण्णासाहेब जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार मन्सूर सय्यद, पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वास बेरड, पोलीस नाईक लक्ष्मण खोकले, पोलीस नाईक शंकर चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाथरुट, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सातपुते, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी कोतकर, पोलीस कॉन्स्टेबल रुदय गौतम घोडके यांनी केली आहे. पोलिसांनी या कारवाई दोन आरोपीना अटक केली असून २ लाख ७६ हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त केला आहे . पुढील तपास जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत आहे .









