जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – (सुदाम वराट)
राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आरोळेनगर येथील मुलांच्या शासकीय निवासी शाळेत निपुण भारत अभियानांतर्गत
गणितोत्सवानिमित्त भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
निपुण भारत अभियानांतर्गत’ राष्ट्रीय गणित दिनानिमित्त 20 ते 22 डिसेंबर रोजी नियोजित गणितोत्त्सव निमित्त रांगोळी स्पर्धा इ.6 वी ते 8 वी आणि 9 वी 10 वी असे गट करून आयोजित करण्यात आली होती. शाळेतील सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीम. अस्वर मॅडम ,भुजबळ मॅडम, पारधी मॅडम व गणित विषय प्रमुख श्रीम. रांजणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
तसेच शेवटी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गणित विषयाचे आपल्या जीवनातील महत्त्व मुख्याध्यापक श्रीम. एस. सी. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रमुख उपस्थिती श्री.महानुर सर सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.









