Friday, October 9, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव का? आकाश बाफना यांचा प्रशासनाला सवाल! ...

जामखेडच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव का? आकाश बाफना यांचा प्रशासनाला सवाल! अतिक्रमण कारवाईत समान न्याय द्या, व्यापाऱ्यांना वेठीस धरू नका!

0
6
जामखेडच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव का? आकाश बाफना यांचा प्रशासनाला सवाल!  अतिक्रमण कारवाईत समान न्याय द्या, व्यापाऱ्यांना वेठीस धरू नका!

जामखेड न्युज – – – – 

जामखेडच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत दुजाभाव का? आकाश बाफना यांचा प्रशासनाला सवाल!

अतिक्रमण कारवाईत समान न्याय द्या, व्यापाऱ्यांना वेठीस धरू नका!

जामखेड शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईवरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कोणताही भेदभाव न करता सर्व अतिक्रमणांवर समान निकषांनुसार कारवाई करावी; मात्र नियमबाह्य आणि मनमानी पद्धतीने अतिक्रमण काढू नये, अशी भूमिका आकाश बाफना यांनी मांडली आहे. शहराच्या विकासासाठी कारवाई करताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून जामखेड शहरात अतिक्रमण नसल्याबाबतचे अधिकृत पत्र नगर परिषद आणि मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. असे पत्र दिले गेले असेल, तर त्यानंतर सहा ते सात महिने अतिक्रमण हटविण्याची कारवाई का झाली नाही? ही कारवाई नेमकी कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून थांबवली होती? याचा खुलासा प्रशासनाने जामखेडकरांसमोर करावा, अशी मागणी बाफना यांनी केली.

जामखेड मधील झालेला राष्ट्रीय महामार्ग हा जुन्या वहिवाटी मार्गानुसार नॅशनल हायवे ऑथॉरिटी यांनी केलेला आहे त्यामध्ये गट हाद्दीनुसार कोणताही निकष लावलेला नाही आणि आता रोड 90% संपूर्ण जामखेड शहरांमध्ये झाला असताना फक्त समर्थ हॉस्पिटल ते बीड कॉर्नर या ठिकाणीच गटाचा नियम का लागू करत आहात? जाणून बुजून गट हद्द हा नियम आपणास करावयाचा असेल तर आपण हा निकष संपूर्ण हायवेसाठी लावला गेला पाहिजे होता परंतु आपण तसं न करता जुन्या वहिवाटीनुसार रस्ता बनवलेला आहे.

नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितल्याप्रमाणे झालेल्या गटार पासून दहा फूट अतिक्रमण सर्व व्यापारी बंधू यांनी काढून दिलेले आहे तरीसुद्धा त्यांचे जास्तीचे जागा पाडण्याचा डाव हा कशासाठी करत आहात संपूर्ण हायवे साठी वेगळा न्याय आणि फक्त समर्थ हॉस्पिटल ते बीड कॉर्नर साठी वेगळा न्याय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला गेला यावेळी सामाजिक कार्यकर्ते ढेपे सर, बाबा पोटरे व सर्वच व्यापाऱ्यांनी व महिला वर्गातून उपस्थित केला.

आत्ता दहा फूट अतिक्रमण स्वखर्चतून सर्वांनी काढलेले आहेत त्याप्रमाणे प्रशासनाने घ्यावा आणि पुढील कारवाई चालू ठेवावी कोणासही वेठीस धरू नये ही विनंती करण्यात आली.गेल्या काही दिवसांपासून शहरातील अतिक्रमण कारवाईवरून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. धनदांडग्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई कधी होणार, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणताही भेदभाव न करता सर्व अतिक्रमणांची तपासणी करून नियमानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे आणि विकासकामांना गती देणे आवश्यक असले, तरी कारवाई करताना कायदेशीर प्रक्रिया आणि नियमांचे पालन होणे तितकेच महत्त्वाचे आहे. एखाद्या भागात कारवाई करून दुसऱ्या भागाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने पारदर्शक भूमिका घ्यावी, असे बाफना यांनी स्पष्ट केले.

जामखेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील असून, जामखेडच्या विकास कामांसाठी आम्ही कायम प्रयत्न करणार आहोत अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत समानता, पारदर्शकता आणि कायदेशीर प्रक्रिया पाळली जावी, अशी अपेक्षा आकाश बाफना यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!