Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या एस.टी. बस सुरू करावी, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची जामखेड आगाराला भेट

एस.टी. बस सुरू करावी, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची जामखेड आगाराला भेट

0
216
जामखेड प्रतिनिधी 
          जामखेड न्युज – – – (सुदाम वराट) 
  तब्बल दोन महिने होत आले तरीही सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची ‘लालपरी’ कर्मचाऱ्यांच्या ‘काम बंद’आंदोलनामुळे एकाच जागी उभी आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत न्यायालयीन स्तरावर कार्यवाही सुरू असल्याने धोरणात्मक निर्णय येण्यास विलंब होऊ शकतो. तो पर्यंत सर्वसामान्य प्रवाशांची आणखी गैरसोय होऊ नये, म्हणून कर्जत-जामखेडचे आ.रोहित पवार यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा.मधुकर आबा राळेभात,तालुकाध्यक्ष मा.दत्तात्रय वारे,
युवक तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी जामखेड एस.टी. आगारातील कर्मचाऱ्यांशी बस चालू करण्यासंदर्भात चर्चा केली व बस सुरू करावी करून विनंती केली.
       यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय काशीद, युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल उगले, कोअर कमिटीचे सदस्य उमरभाई कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहराध्यक्ष अमोल गिरमे, वसीम सय्यद, महेश राळेभात, फिरोज बागवान, सरपंच सुनील उबाळेसह राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!